फेरमतदानमोजणीत सुशांत शेलार विजयी

 कोल्हापूर : पोलिसनामा ऑनलाईन
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या फेरमतमोजणी आज सोमवारी पडली. अटीतटीच्या लढतीत  अभिनेता गटात सुशांत शेलार विजयी झाले. त्यांनी माजीअध्यक्ष विजय पाटकर यांचा १६ मतांनी पराभव केला. भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या फेरमतमोजणी तब्बल अडीच वर्षानंतर झाली आहे .
 सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या एप्रिल २०१६ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मेघराज राजे भोसले, सतीश रणदिवे यांच्या समर्थ पॅनेलने १४ पैकी १२ जागांवर विजय मिळवला होता. विजय पाटकर, सतीश बिडकर या क्रियाशील पॅनेलच्या दोन उमेदवारांनी विजय मिळवला होता. तत्कालीन अध्यक्ष विजय पाटकर यांच्या अभिनेता गटातून विजयी होण्याला सुशांत शेलार यांनी धर्मादाय कार्यालयाकडे हरकत घेतली होती, पण ती फेटाळण्यात आल्यानंतर   शेलार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशाने आज फेरमोजणी झाली, यावेळी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यासह बहुतांशी संचालक उपस्थित होते.
[amazon_link asins=’B07BCGC13F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bb3184f7-a50e-11e8-af7d-6bdc5f859d81′]
नुकतेच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले शेलार यांना ५९१ तर पाटकर ५७५ मते मिळाली. या यशाबद्दल बोलताना सुशांत शेलार म्हणाले, गेल्या अडीच वर्षाची लढाई आज संपली. माझी शंका अखेर खरी ठरली.जरी अडीच वर्षाचा कालावधी मिळाला तरी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करील.   या कामातून आनंद साजरा करणार आहे. तर, पाटकर म्हणाले, फेरमतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक झाली आहे  मला पराभव मान्य आहे. मी यापूर्वीही चांगलं काम करत होतो आणि भविष्यती चांगलं काम करण्याचा विश्वास आहे. आम्ही संचालक म्हणून काम करत  होतो आता सभासद म्हणून काम करील .
 या विजयानंतर चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात  सुशांत यांच स्वागत करण्यात आलं.