कंगनाचा आदित्य ठाकरेंवर निशाणा, म्हणाली – ‘तुमच्या वडिलांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवली, हेच गलिच्छ राजकारण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या कथित आत्महत्ये प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अखेर मौन सोडले आहे. आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये आदित्य ठाकरे यांनी गलिच्छ राजकारण असल्याचे नमूद केले आहे.

दरम्यान, भाजप नेते नारायण राणे सुशांत सिंह प्रकरणात पत्रकार परिषद घेऊन ही सुशांत सिंहची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर आरोप केला आहे. यामध्ये शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

आता यावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिनं थेट आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. एका पाठोपाठ चार ट्विट करून कंगना हिनं आदित्य ठाकरे यांना 7 प्रश्न विचारले आहे. कंगनानं म्हटलं आहे की, पहा कोण गलिच्छ राजकारणावर चर्चा करत आहे. तुमच्या वडिलांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली आहे. हेच गलिच्छ राजकारण आहे. आता राजकारण विसरा आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आपल्या वडिलांकडून आधी सात प्रश्नांची उत्तर घेऊन या.

कंगनाने विचारले हे प्रश्न
मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी FIR का नोंदवली नाही. फेब्रुवारीमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी पोलिसांना माहिती दिली होती की, सुशांतच्या जीवाला धोका आहे. मग मुंबई पोलिसांन सुशांतचा मृत्यूला सुसाइड का घोषित केलं ? आपल्याकडे फॉरेंसिक एक्सपर्ट का नाही आहे. सुशांतच्या फोन रेकॉर्ड का उपलब्ध नाही. त्यानं मृत्यूच्या एक आठवडा आधी कोणाकोणाला फोन केले होते ? आयपीएस अधिकारी विनय तिवारीला विनाकारण क्वारंटाइन का करण्यात आलं ? सीबीआय चौकशीच्या मागणीची सगळ्यांना भीती का वाटत आहे ? रिया आणि तिच्या कुटुंबीयांनी सुशांतचा पैसा कसा लुटला ? असे एका पाठोपाठ एक सात प्रश्नांचा भडिमार कंगनानं आदित्य ठाकरे यांच्यावर केला आहे.