Sushant Singh Rajput Death Anniversary | राष्ट्रवादीचा CBI ला थेट सवाल; म्हणाले – ‘सुशांतची आत्महत्या नव्हती तर हत्यारा कोण?’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एक वर्षानंतरही सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा (Sushant Singh Rajput Death Anniversary) तपास (Investigation) झालेला नाही. त्यामुळे त्याची आत्महत्या (Suicide) नव्हती तर त्याचा हत्यारा (Killer) कोण हे सीबीआयने (CBI) जनतेला सांगितले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते (NCP spokesperson) आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

…म्हणून महाराष्ट्र सरकारला बदनाम केलं

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावर भाजपला (BJP) बिहार निवडणूक (Bihar Election) लढवायची होती. म्हणून सीबीआयला पुढे करुन महाराष्ट्र सरकारला (MVA Goverment) बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आलं होतं’ असा गंभीर आरोप देखील नवाब मलिक यांनी केला आहे.

CBI तपासात निष्पन्न काय झालं ?

दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येवरून भाजपने महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) बेछुट आरोप केले होते. एवढंच नाहीतर सीबीआय चौकशीची (CBI inquiry) मागणीही केली होती. पण, वर्षभराच्या तपासानंतर या प्रकरणी सीबीआयच्या हाती काहीच लागले नाही. याच मुद्यावरून नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजप आणि सीबीआयवर (BJP and CBI) हल्लाबोल केला. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस (Mumbai Police) करत असतानाच राजकीय कारणामुळे या प्रकरणाचा गुन्हा (FIR) बिहार सरकारने (Government of Bihar) दाखल केला आणि ही केस सीबीआयकडे दिली होती, परंतु निष्पन्न काय झालं ? असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : sushant singh rajput death anniversary ncp leader nawab malik ask question to cbi, said if not sushants suicide then who is the killer

हे देखील वाचा

दुर्दैवी ! भरधाव कार खड्ड्यात कोसळल्याने चौघा शिक्षकांचा मृत्यू, हिंगोली जिल्ह्यातील घटना

Ajit Pawar | कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण दुपटीने वाढवा

BJP ला 750 कोटी देणगी देणारे ‘ते’ कोण ? उद्योगपतींच्या चाव्या भाजपच्या व्यापारी मंडळाकडे ? जाणून घ्या सविस्तर

Video: मराठा आरक्षणावरून खासदार उदयनराजे कडाडले