मोठा खुलासा ! मृत्यूपूर्वी सुशांतनं ट्विट करून सांगितलं होतं कारण, नंतर केलं Delete

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या निधानानंतर अनेकांनी प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केलं आहे. प्रत्येकाला हाच प्रश्न पडला आहे की, सुशांतनं असं पाऊल का टाकलं आहे. नुकताच यासंदर्भात धक्कादायक खुलासा झाला आहे.

जगाचा निरोप घेण्याआधी सुशांतनं 3 ट्विट्स शेअर केले होते. हे ट्विट त्यानं लगेच डिलीट केले होते. या ट्विटवरून लक्षात येत आहे की, तो वाईट काळातून जात होता आणि त्याची मानसिक स्थितीही ठिक नव्हती.

सुशांतनं पहिल्या ट्विटमध्ये लिहिलं होतं की, “पुरुषांना त्यांच्या मेंटल हेल्थ, आयुष्याबद्दल, विचारांबद्द कधीच काही विचारलं जात नाही. तसं ट्रीटही केलं जात नाही. मी यातून गेलो आहे आणि आता थकलो आहे. माहिती नाही मी हे काय लिहित आहे.”

दुसऱ्या ट्विटमध्ये सुशांतनं लिहिलं की, “मी आयुष्यातील अडचणींसोबत लढलो आहे. मी काही वेळातच हे ट्विट डिलीट करणार आहे. जेणेकरून लोकांना हे कळावं की, मी या मेडियोकर सक्सेसला वैतागलो आहे. मला आता कोणतंही फेम नको आहे.”

आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये सुशांत म्हणाला होता की, “मी चांगल्यासाठीच हे सगळं करत आहे. मी भलेही दूर जात आहे परंतु तुम्हा सगळ्यांच्या जवळ राहिल. आशा आहे की यानंतर लोक मनात काही ठेवण्यापेक्षा एकमेकांसोबत संवाद साधतील. गुड बाय.”