CINTAA च्या जनरल सेक्रेटरी पदावरून सुशांत सिंहचा राजीनामा, CAA विरोधात उठवला होता आवाज !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही आणि सिनेमा अशा दोन्ही ठिकाणी आपली ओळख तयार करणारे अ‍ॅक्टर सुशांत सिंह एंटरटेनमेंट जगतामधील प्रसिद्ध संस्था सिने अँड टीव्ही आर्टीस्ट असोसिएशन (CINTAA) म्हणजेच सिंटाचं जनरल सेक्रेटरी पद सोडत आहे. CAA ला त्यानं जोरदार विरोध केला होता. मुंबईतील प्रदर्शनांमध्ये त्यानं आपली बाजूही मांडली होती. यानंतर प्रसिद्ध शो सावधान इंडियामधून काढल्यानंतर तो म्हणाला की, सीएएला विरोधा केल्यानं असं झालं आहे.

एका मुलाखतीत बोलताना सुशांत म्हणतो, “मला पुढे जाण्यासाठी आणि या पदासाठी नवीन लिडरला रस्ता देण्यासाठी ही योग्य वेळ आहे. माझा कार्यकाळ 1 मे 2020 रोजीच संपला आहे. मी आता असं ठरवलं आहे की, मी पुढील निवडणूक लढवणार नाही. कोरोनामुळं इलेक्शन पुढं ढकलण्यात आली आहे.”

सुशांतनं हे पद सोडण्याबद्दल आणि इलेक्शन न लढण्यामागील कारणावर काहीही भाष्य केलं नाही. असंही असेल की, त्याला आपल्या करिअरवर फोकस करायचा असेल किंवा त्याचे काही फ्युचर प्लॅन्स असतील.

अनेकांना माहिती आहे की सिंटा खूप प्रतिष्ठित संस्था आहे आणि सिंटाकडे अनेक अधिकारही आहेत. सुशांत सिंह टीव्ही शो सावधान इंडिया होस्ट करत होता परंतु त्याला या शोमधून काढण्यात आलं होतं. सुशांतनं स्वत:च ट्विट करत याबाबत माहिती दिली होती.

सुशांतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सुशांतनं द लिजेंड ऑफ भगत सिंह, सत्या, दम, लिपस्टिक अंडर माय बुर्का, हेस्ट स्टोरी 2, अशा अनेक सिनेमा काम केलं आहे.