सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण : NCB कडून फरार रेगेल महाकाल अटक

मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी संबंधित आज आणखी एक यश एनसीबीला आले आहे. पोलिसांनी फरार आरोपी रेगेल महाकाल याला अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

महाकाल हा अनुज केशवानी या आरोपीला ड्रग्ज पुरवत होता. लोखंडवाला येथील मिलाटनगरमध्ये एनसीबीच्या पथकाने मध्यरात्री छापा टाकून महाकाल याला अटक केली. त्याच्याकडून काही ड्रग्जही जप्त करण्यात आले आहेत.

नॉकोटिक कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाशी ड्रग्जचा संबंध असल्याचे निष्पन्न झाल्यावर बॉलीवूडमधील अनेक नामवंत कलाकाराची चौकशी केली. अनेकांना त्यात आतापर्यंत अटकही करण्यात आली आहे. कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष यांना गेल्या महिन्याच्या अखेरीस अटक केली होती. न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर एनसीबीची ही पहिलीच कारवाई आहे.