मरणाच्या दारातून परतल्यानंतर ‘या’ कारणामुळे सुष्मिता सेनचे सोशलवर अकाऊंट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस सुष्मिता सेन खुलून जगण्यात विश्वास ठेवते. विषय कुटुंबाचा असो किंवा प्रेमाचा ती कधीच काही लपवत नाही. आजकाल ती तिच्या रिलेशनशिपमुळे अनेकदा चर्चेत येताना दिसत आहे. तिच्या प्रियकरासोबत अनेक फोटो शेअर करत असते. ती तिचं प्रेम जगाला दाखवू इच्छित असते. परंतु तुम्हाला माहीत आहे का सुष्मिताने सोशलवर येण्याचा निर्णय का घेतला आहे. याला खास कारण आहे. याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

रिपोर्ट्सनुसार, सुष्मिताने नुकतंच एका मुलाखतीत बोलताना सांगितलं की, “मी एकदा खूपच आजारी होते. माझी प्रकृती खूपच खालावलेली होती. यानंतर एक वेळ अशी आली की, मला वाटलं की, जर मी आता जिवंत राहिलेच नाही तर? लोकांना कसे कळेल की मी कशी होती ते? इतकेच नाही तर, हाच विचार करत मी एके रात्री सोशल मीडियावर अकाऊंट बनवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मी इंस्टाग्रामवर माझं अकाऊंट बनवलं. तेव्हापासूनच मी सोशलवर सक्रिय असते.”

तुम्हाला सांगू इच्छितो की, सुष्मिताचे इंस्टावर लाखो फॉलोवर्स आहेत. पंरतु सुष्मिता सेन मात्र एकालाही इंस्टावर फॉलो करत नाही. इंस्टावर तिचे तब्बल 4 मिलियन फॉलोवर्स आहेत. ती नेहमीच तिचे कुटुंबासोबत आणि प्रियकरासोबतचे फोटो सोशलवर शेअर करत असते. तिचे फोटो तिच्या चाहत्यांना विशेष आवडतात.