Coronavirus : काय सांगता ! होय, ‘कोरोना’ला रोखण्यासाठी ‘हायटेक’ प्लॅन, शहरभर लावले 1 लाख CCTV

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला असून, आतापर्यंत ७ लाखांच्या वर संसर्गित रुग्ण तर ३४ हजारांच्या वर मृत्यूचा आकडा पोहचला आहे. कोरोनाचा वाढत असलेला प्रभाव रोखण्यासाठी जगातील अनेक बड्या देशांनी उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. लॉक डाऊनसाठी तसेच संसर्गित व्यक्तींची ओळख पटविण्यास या तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. रशियाने तर, कोरोना संसर्गित रुग्णांचा शोध घेण्यासाठी हायटेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली असून,या मार्फत मॉस्को शहरात १ लाख ७० हजाराहून अधिक कॅमेरे बसविण्यात आले आहे.

या बसविलेल्या हायटेक कॅमेराच्या सहाय्याने व्यक्तीची संपूर्ण माहिती मिळू शकते. तसेच संशयिताची ओळख पटवून त्या व्यक्तीचा प्रवास इतिहास,वैद्यकीय इतिहास सर्व काही रेकॉर्डची माहिती मिळते. तर लॉकडाऊन च्या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीवर या द्वारे नजर ठेवून त्यांना ताब्यात घेतले जाते. रशियामध्ये आतापर्यंत १ हजार ५३४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे व केवळ ८ जणांचा मृत्यू झाला आहे. संसर्गित लोकांचा आकडा वाढू नये यासाठी रशियन प्रशासनाच्या वतीने जगातील सर्व हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी इंटरनेट द्वारे चालणाऱ्या अनेक तंत्रज्ञांनाना मंजुरी दिली आहे. कोरोना संसर्गाच्या विरुद्ध चालणाऱ्या या युद्धात सरकारने त्यांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. तसेच यामार्फत सरकार तंत्रज्ञानाच्या शक्तीचीही तपासणी करत असून,प्रत्येकावर नजर ठेवली जात आहे. दरम्यान, यामध्ये लोकांच्या गोपनीयतेची पूर्ण काळजी सरकाच्या वतीने घेतली जात आहे.

मॉस्को मध्ये आतापर्यंत कॅमेराच्या मदतीने लॉकडाऊन चे आदेश मोडणाऱ्या २०० हून अधिक जणांवर कार्यवाही केली आहे. तर, मोबाईल मार्फत देखील लोकांना ट्रॅक केले जात आहे. याच्या मदतीने बीजिंग येथून आलेल्या चिनी महिलेला अटक करण्यात आली. त्यामुळे रशियामध्ये संसर्गित रुग्णांची संख्या इतर देशांच्या तुलनेत कमी आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like