घातपाताचा कट उधळला, औरंगाबादमध्ये ATS कडून डॉक्टरसह 4 जण ताब्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र दहशतवादविरोधी सेलने (एटीएस) चार ताब्यात घेतले आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबादमधील एका डॉक्टरचाही समावेश आहे. मुंब्रा आणि औरंगाबादमधून पकडलेल्या ९ संशयित दशतवाद्यांच्या संपर्कात असल्याच्या कारणावरुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

काश्मीरमधील सैनिकांच्या रेशनमध्ये किंवा पाण्यात विष कालवून मोठा घातपात करण्यात येणार असल्याचा इशारा नुकताच जम्मू काश्मीर तसेच दिल्लीमध्ये देण्यात आला आहे. गुप्तचरांनी हा इशारा दिला आहे. त्याचा संबंध औरंगाबादशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आयसीस या दहशतवादी संघटनेच्या पकडण्यात आलेल्या ९ काश्मीरमधील दहशतवाद्यांशी संपर्कात असल्याचे आढळून आले आहे.

हेही वाचा – मोदींवरील ‘त्या’ डॉक्युमेंट्रीसाठी जाळली चक्क रेल्वेची बोगी 

अन्न आणि पाण्यात विष कालवून घातपात करण्याच्या संशयावरुन महाराष्ट्र एटीएसने जानेवारी महिन्यात आयसिस या दहशतवादी संघटनेच्या ९ संशयितांना ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेला डॉक्टर संपर्कात होता. एटीएसने तीन दिवस त्याची कसून चौकशी केली. मात्र या डॉक्टरचे नाव अद्याप जाहीर करण्यात आले नाही.

एटीएसने मुंब्रामधून मझहर शेख, जम्मन, सलमान खान, फरहाद अन्सारी यांच्यासह एका अल्पवयीन तरुणाला अटक केली होती. तर औरंगाबादमधील छाप्यांमध्ये मोहम्मद मोहसीन सिराजउल्लाह खान, मोहम्मद तकीउल्लाह सिराज खान, काजी सर्फराज आणि मुशाहेदूल इस्लाम उर्फ तारेख यांना पकडले होते.

या ९ संशयितांकडे स्फोटकांऐवजी या संशयितांकडे हायड्रोजन पॅरॉक्साईड, विषारी पावडर, आणि अ‍ॅसिड सापडले होते. राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रम, उच्चभ्रूंचे लग्नसोहळ्यांसह गर्दी जमवणारे कार्यक्रम त्यांचे लक्ष्य होते.

हेही वाचा – जेव्हा मोदीजी ‘कोची’ चे ‘कराची’ करतात… 

Loading...
You might also like