Swapnil Joshi | स्वप्नील जोशीने शेअर केला ‘नो मेकअप’ लुकचा Video व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम : मराठी सिनेसृष्टीत रोमँटिक अभिनेता म्हणून स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) याची ओळख आहे. त्याने आजवर अनेक रोमँटिक भूमिका रुपेरी पडद्यावर साकारल्या आहेत. त्याच्या अभिनयाच्या मुली सगळ्यात जास्त चाहते असल्याचे नेहमीच दिसतात. सध्या स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत सौरभ हे पात्र साकारताना दिसत आहे. नुकताच स्वप्नील चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

 

स्वप्नील जोशी हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. विविध रील्स, फोटो, व्हिडिओ शेअर करून तो चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. जे पाहून चाहतेदेखील आनंदी होत असतात.

या व्हिडिओमध्ये स्वप्नील (Swapnil Joshi) खूप थकलेला दमलेला दिसत आहे.
तर पांढरी दाढीदेखील त्याची दिसत आहे आणि यामध्ये “सकाळी साडेपाच वाजता उठल्यानंतर पुन्हा दोन मिनिटांनी
उठतो असे म्हणत थेट सकाळी आठ वाजता जाग येते” असे संभाषण या व्हिडिओमध्ये ऐकायला येत आहे.
या व्हिडिओमध्ये स्वप्निलचे हावभावदेखील हुबेहूब व्हिडिओला जुळत असल्यामुळे हा व्हिडिओ सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे,
तर काही तासांमध्येच या व्हिडिओला तीन हजारांपेक्षा अधिक लाइक मिळाले आहेत.

 

Web Title :- Swapnil Joshi | zee marathi serial actor swapnil joshi share funny video on instagram his no makeup look viral see details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Lonavala Local | कामशेत स्थानकाच्या कामामुळे पुणे लोणावळा मार्गावरील अनेक लोकल रद्द

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार ९५,०००!; मोदी सरकारची नववर्षातील भेट

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध; MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 89 जणांवर कारवाई