Swara Bhasker | स्वरा भास्करचे ते ट्विट चर्चेत; अप्रत्यक्षपणे मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांवर साधला निशाणा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Swara Bhasker | सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान यांच्या ‘पठाण’ या चित्रपटाची. या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याने राज्यात अनेक राजनैतिक वळण घेतले आहे. या गाण्यामध्ये दीपकाने घातलेल्या कपड्यांवरून वाद निर्माण झाला आहे. तर मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी बेशरम रंग गाण्यातील दृश्य आणि कपडे यावर आक्षेप घेतला आहे. या सर्व गोष्टींवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी दीपिकाचे समर्थन केले आहे. यात अभिनेत्री स्वरा भास्करचा (Swara Bhasker) ही समावेश आहे.

 

सध्या अभिनेत्री स्वरा भास्करने शेअर केलेले ट्विट चर्चेत आहे. ज्यामध्ये दीपिका आणि शाहरुख यांच्या गाण्यावरून सुरू झालेल्या वादावर स्वराने ट्विट केले आहे. एका बातमीचा स्क्रीन शॉट शेअर करत स्वरा (Swara Bhasker) म्हणाली, “आपल्या देशाच्या सत्ताधारी नेत्यांनी अभिनेत्रींच्या कपड्यांकडे बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा काही काम केले असते तर बरे झाले असते”. तिने नाव न घेता मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना टोला लगावला आहे. सध्या सोशल मीडियावर स्वरा भास्करचे हे ट्विट धुमाकूळ घालत आहे.

 

पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावर बोलताना मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले होते
की, “गाण्यात दाखवण्यात आलेले दृश्य हे दूषित मानसिकतेचे आहे.
जर या गाण्यातील दृश्य आणि कपड्यांचे रंग बदलले नाही तर हा चित्रपट मध्यप्रदेश मध्ये प्रदर्शित केला जाणार नाही”.

 

Web Title :- Swara Bhasker | swara bhaskar open up on pathan controversy deepika padukone wearing saffron colour bikini

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MVA Mahamorcha | अखेर पोलिसांनी महामोर्चाला दिली परवानगी, शरद पवार म्हणाले- ‘एकनाथ शिंदेंनी सांगितले होते…’

Vivek Oberoi | ऐश्वर्या राय आणि अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्या नात्याबद्दल अखेर विवेकने केला ‘हा’ मोठा खुलासा

Sushma Andhare | ‘मी पक्षाने सांगितले, तर राजीनामा देण्यास तयार आहे, पण…’ – सुषमा अंधारे