Swarad Foundation Pune | छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर कारवाई करा, स्वारद फाऊंडेशनची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Swarad Foundation Pune | छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्यांविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्याची मागणी पुण्यातील स्वारद फाउंडेशनच्या (Swarad Foundation Pune) वतीने करण्यात आली आहे. स्वारद फाउंडेशनच्या संस्थापिका स्वाती शरद मोहोळ (Swati Sharad Mohol) यांनी याबाबत कोथरूड पोलिस स्टेशनचे (Kothrud Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Sr PI Hemant Patil) यांना निवेदन दिले आहे.

 

स्वाती शरद मोहोळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. ह्या अशा पोस्टमुळे दोन धर्मांमधील नागरिकांमध्ये तेढ निर्माण करण्याचे, सलोखा बिघडवण्याचे उद्योग सुरु आहेत. त्यामुळे अशा पोस्ट व्हायरल करणाऱ्या विकृतींना शोधून काढून त्यांची पाळेमुळे खोदून काढून कायद्याने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. (Swarad Foundation Pune)

स्वारद फाऊंडेशनने दिलेल्या निवेदनात छत्रपती शिवाजी महाराज यांचे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करण्यात आलेल्या इन्स्टाग्राम अकाऊंट
बाबत माहिती दिली आहे. तसेच यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.

 

 

 

Web Title :  JSB Bank Ltd | Kishor Bhagwan Tarwade unopposed as Director of Jaibhavani Sahakari Bank Ltd

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा