15 पत्नींसह राहतो ‘हा’ गरीब देशाचा राजा, पत्नीसाठी विकत घेतल्या 100 कोटींच्या कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक त्यांचा देश आहे. सुमारे ६० टक्के लोक दारिद्र्य रेषेखालील जगतात. परंतु या देशातील राजे अतिशय विलासी जीवन जगण्यास कोणतीही कसर सोडत नाहीत. ही आफ्रिकन देश स्वाझीलँडची (नवीन नाव इस्वातिनी) कथा आहे. स्वाझीलँडच्या राजा मस्वति -३ ला १५ बायका आहेत. त्यांनी अलीकडेच पत्नींसाठी ११९ कोटींच्या लक्झरी कार्स खरेदी केल्या असून, यावर अनेकजण प्रश्न उपस्थित करीत आहेत. स्वाझीलँड अनेक कारणांनी कुख्यात आहे. बहुविवाह येथे वैध आहे. परंतु राजाकडे सध्या १५ बायका आहेत. तर त्यांच्या एका पत्नीचा मृत्यू झाला आहे.

दरवर्षी स्वाझीलँडमध्ये टॉपलेस कुमारी मुलींचे परेड असते. दरवर्षी या काळात राजा स्वत: साठी एक नवीन बायको निवडतो. या परेडमध्ये भाग न घेणार्‍या मुलींना अनेक प्रकारे शिक्षा केली जाते. राजाची पत्नी निवडण्याच्या प्रथेवर टॉपलेस कुमारी मुलींच्या परेडने प्रश्नचिन्ह लावले आहे. तथापि, या सर्व प्रथेला सर्वांनी विरोध दर्शविला असूनही ती प्रथा अद्याप बंद केलेली नाही.
Swaziland
अलीकडेच राजाने आपल्या १५ पत्नींसाठी १५ Rolls-Royces आणि BMW कार खरेदी केल्या आहेत. गेल्या वर्षी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राजाने आपल्या देशाचे नाव बदलले. त्यांनी देशाचे नाव स्वाझीलँड वरून बदलून eSwatini केले. तथापि, आजही बहुतेक लोकांना हे स्वाझीलँडच्या नावाने माहित आहे. news.com.au च्या रिपोर्ट नुसार, राजा स्वतः १४३४ कोटीचा मालक आहे. त्याच्याकडे प्राइवेट जेट्स पासून स्वतःचे एयरपोर्ट देखील आहेत. २०१४ मध्ये त्यांनी आपल्या घराचे वार्षिक बजेट ४३७ कोटी केले होते.

आता पुन्हा आपल्या परिवारावर मोठ्या प्रमाणावर रक्कम खर्च केल्याप्रकरणी देशातील नागरिक हे राजाच्या या वागण्याला विरोध दर्शवत आहेत. सोशल मीडिया वरही खूप साऱ्या लोकांनी लक्झरी कार घेतल्याच्या निर्णयामुळे आणि ११९ कोटी रुपयांचा खर्च केल्याप्रकरणी नागरिक हे राजाचा विरोध करत आहे. स्वाझीलँड हा आफ्रिकेतील एक देश असून या देशाची लोकसंख्या सुमारे १.३ दशलक्ष आहे. स्वाझीलँडचे शेजारील देश दक्षिण आफ्रिका आणि मोझांबिक हे आहेत.
Swaziland
राजा कशी निवडतो कुमारी पत्नी
रीड डान्स सोहळा प्रत्येक वर्षी स्वाझीलँडमध्ये आयोजित केला जातो. सप्टेंबरमध्ये झालेल्या या सोहळ्यात हजारो (सुमारे ४० हजारांपर्यंत) कुमारी मुली भाग घेतात. मुलींना खुल्या छातीवर परेड करण्यास भाग पाडले जाते. रीड डान्स सोहळ्याच्या परंपरेनुसार, राजास अधिकार आहे की तो दरवर्षी यापैकी एका मुलीला आपली पत्नी म्हणून निवडू शकतो. गेल्या काही वर्षात अनेक मुलींनी यावर प्रश्न विचारला होता तर त्यांना सांगण्यात आले की परेडमध्ये भाग न घेतल्यास त्यांच्या कुटुंबियांना दंड भरावा लागेल.

स्वाझीलँडचे राजे मोठ्या कुटुंबात राहत आहेत. राजाला १५ बायकासह २५ पेक्षा जास्त मुलं आहेत. गेल्या वर्षी राजाच्या एका पत्नीचे निधन झाले. मीडियाच्या रिपोर्टनुसार, 37 वर्षीय सेंतनी मसान्गो यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

१९८६ पासून मस्वति-३ राजाच्या पदावर आहे. यापूर्वी, १८४१ कोटी रुपये खर्च करून लक्झरी जेट खरेदी करण्यासाठीही तो वादात सापडला होता. कारण देशातील बहुतेक लोक हे गरिबीचे जीवन जगत असून माफक संसाधनापासून ते वंचित आहेत. वर्ल्ड फूड प्रोग्रामच्या अंदाजित आकडेवारीनुसार, स्वाझीलँडच्या ६० टक्के पेक्षा जास्त लोक दारिद्रय रेषेखालील जीवन जगतात. आणि हैराण करून सोडणारी बाब म्हणजे १५ ते ४९ वयोगटातील एक चतुर्थांश लोकांना एचआयव्हीची लागण झाली आहे.

काही अहवालांनुसार, देशातील १० टक्के लोकसंख्या उच्च वर्गामध्ये येते. या १० टक्के लोकांचा खर्च देशाच्या निम्म्या लोकसंख्येइतका आहे. सरकारी आकडेवारीनुसार ब्रिटनने गेल्या वर्षी स्वाझीलँडला २ कोटी रुपयांची मदत दिली होती. तर १९९७ ते २०१७ दरम्यान ब्रिटनने स्वाझीलँडला एकूण ६२ कोटी रुपये दिले आहेत.
Swaziland King
ब्रिटिश माध्यमांच्या वृत्तानुसार, राजाने सर्वांचा विरोध धुडकावत १२० बीएमडब्ल्यू कार परदेशातून आणल्या आहेत. ट्रकमधून आणलेल्या मोटारींची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचवेळी, राजाला विरोध करणारे नेते म्हणतात की देशाची आरोग्य व्यवस्था अत्यंत वाईट झाली आहे. नागरी नोकरदारांच्या पगारामध्ये ३ वर्षांपासून वाढ केली नाही आणि या बाबतीत नागरिकांना राजाने वचन देखील दिले होते.

त्याच वर्षी स्वाझीलँडच्या सरकारी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरत पगार वाढवण्याची मागणी केली होती. विरोधी पक्षनेत्यांनी म्हटले आहे की राजा टॅक्स रूपात मिळालेल्या जनतेच्या पैशांचा गैरवापर करीत आहे, या राजाच्या निर्णयाचा ते तीव्र निषेध करीत आहे. नागरिकांनी वाईट राजवटीविरोधात उभे राहून आवाज उठवावा असे आवाहन विरोधी पक्षनेते वान्डिले ड्लूडलू यांनी केले आहे. ते म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत लोकांना गरीबीत ठेवण्यासाठी आपण राजाला संमती देऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल.

यापूर्वी स्वाझीलँडवर ब्रिटनचे राज्य होते. १९६८ मध्ये ब्रिटनमधून स्वाझीलँडला स्वातंत्र्य मिळाले. त्याचवेळी राजा मस्वति-३ ने काही काळ ब्रिटनच्या डोरसेटमधील शाळेत शिक्षण घेतले होते.

Visit : Policenama.com