Syed Bhai Passes Away | मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे माजी अध्यक्ष सय्यद भाई यांचं निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Syed Bhai Passes Away | मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे (Muslim Satyashodhak Mandal) संस्थापक सदस्य आणि माजी अध्यक्ष सय्यद भाई यांचं निधन (Syed Bhai Passes Away) झालं आहे. ते 87 वर्षाचे होते. पुण्यातील इनामदार हॉस्पिटल (Inamdar Hospital Pune) मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सय्यद भाई यांचा सामाजिक कार्यकर्ते म्हणून अखंड प्रवास सुरू होता.

 

मागील दोन दिवसापुर्वी सय्यद भाई घरी पडले असल्याने त्यांना थोडं मांडीला दुखापत झाली होती. यानंतर पुण्यातील इनामदार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचा श्वसनाचा त्रास वाढल्याने आज (शुक्रवारी) दुपारी त्यांचं निधन झालं आहे.

 

 

तलाक पीडित मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देत असतानाच त्यांच्या पुनर्वसनासाठी
अविरत कार्यरत राहणाऱ्या हमीद दलवाई (Hamid Dalwai) यांच्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या
कामाची धुरा त्यांच्या पश्चात सय्यद भाई (Syed Bhai) यांनी निरंतरपणे वाहिली आहे.
तिहेरी तलाक पद्धत बंद होण्यासाठी दीर्घ काळ लढा देणाऱ्या सय्यदभाई यांच्या कार्याची,
योगदानाची दखल घेऊन निवड समितीने सय्यदभाई यांचे नाव 2019 च्या चतुरंग जीवनगौरव पुरस्कारासाठी निश्चित केले होते.

 

Web Title :-Syed Bhai Passes Away | Former chairman of Muslim Satyashodhak Mandal Syed Bhai passes away

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा