Symbolic Helmet Day In Pune | पुण्यात उद्या ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’; वाहतूक पोलीस कारवाई, जनजागृती करणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Symbolic Helmet Day In Pune | रस्त्यावर जागोजागी उभे राहून दुचाकीस्वारांना चौकात अडवून वाहतूक पोलीस (Pune Traffic Police) हेल्मेटसक्तीची कारवाई करत असत. त्याला पुण्यात विरोध झाल्याने आता चौकातील कारवाई बंद झाली. फक्त सीसीटीव्हीद्वारे सध्या हेल्मेट सक्तीची कारवाई केली जात आहे. बुधवारी (दि. 24२४ मे) पुण्यात ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’ (Symbolic Helmet Day In Pune) साजरा करण्यात येणार आहे. शहरातील सर्व प्रमुख शासकीय कार्यालयाबाहेर हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांची जनजागृती करण्याबरोबरच कारवाई करण्यात येणार आहे.

रस्त्यावरील वाढत्या अपघातात दुचाकीस्वारांचा सर्वाधिक समावेश असल्याने जिल्हाधिकारी राजेश देशमुख
(Collector Rajesh Deshmukh) यांनी हेल्मेट वापराबाबत व्यापक जनजागृतीसाठी 24 मे रोजी
‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’ साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी सर्वप्रथम सर्व शासकीय अधिकारी,
कर्मचारी यांनी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. (Symbolic Helmet Day In Pune)

याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (Pune Traffic Branch DCP Vijayakumar Magar)
यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार सर्व प्रथम सर्व शासकीय कार्यालयात
येणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांनी हेल्मेटचा वापर करावा, यासाठी जनजागृती (Public Awareness)
करण्यात येईल. तसेच विना हेल्मेट असलेल्या दुचाकीस्वारावर कारवाई करण्यात येणार आहे.
त्यासाठी सध्या असलेल्या वाहतूक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची शासकीय कार्यालयाच्या परिसरात नेमणूक करण्यात आली आहे.

Web Title :   Symbolic Helmet Day In Pune ‘Symbolic Helmet Day’ tomorrow in Pune; Traffic police will take action and create public awareness

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police Transfers- PC To PSI Promotion | राज्यातील 385 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती ! पुणे शहरातील 31, पिंपरीमधील 12, पुणे ग्रामीणमधील 3 तर पुणे लोहमार्गमधील 6 जणांचा समावेश; जाणून घ्या नावे

Pune Crime News | Plunge – All Day Kitchen and Bar Pub चा Owner Jitesh Mehta पदेशात? 3 सट्टेबाजांच्या पोलिस कोठडीत 4 दिवसांची वाढ; पैशांच्या देवाण-घेवाणीसाठी G-Pay, UPI चा प्रचंड वापर, अनेक व्यापारी ‘रडार’वर

News Police Stations In Pune | सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, हडपसर, लोणी काळभोर, लोणीकंद, चंदनगर आणि चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे लवकरच विभाजन !