सिंडिकेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! आजच करा अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सिंडीकेट बँकेने वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी जागांची भरती काढली असून यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ०५ सप्टेंबर २०१९ आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या वेबसाईटवर असलेली अधिकृत नोटिफीकेशन वाचली पाहिजे. त्यातील महत्त्वाच्या तारखा, पात्रता निकष, अर्ज फी, निवड प्रक्रिया इत्यादींसह सर्व महत्वाची माहिती जाणून घेऊन अर्ज करा. याठिकाणी आम्ही तुम्हाला यासंबंधी अधिकची माहिती देत आहोत.

पोस्ट तपशील:
पोस्ट नाव: पदांची संख्या
वरिष्ठ व्यवस्थापक ०६

महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाईन अर्ज सुरु करण्यासाठी तारीख : २२ ऑगस्ट २०१९
ऑनलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीखः ०५ सप्टेंबर २०१९

शैक्षणिक पात्रता:
उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता एमबीए / सीए सीएफए / आयसीडब्ल्यूए असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी खालील सूचना डाउनलोड करुन ती वाचा.

वय मर्यादा:
उमेदवारांचे किमान वय २५ वर्षे आणि कमाल वय ३५ वर्षे निश्चित केले गेले आहे.

अर्जाची फी:
सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना ६०० रुपये
एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी १०० रुपये

अर्ज कसा करावा:
इच्छुक उमेदवार www.syndicatebank.in वेबसाइटवर २२ ऑगस्ट २०१९ ते ०५ सप्टेंबर २०१९ दरम्यान ऑनलाईन अर्ज करू शकतात.

निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी / जीडी / मुलाखतीवर आधारित असेल.

आरोग्यविषयक वृत्त –