T10 League-Chris Gayle | ख्रिस गेलचा धमाका !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – T10 League-Chris Gayle | टी20 वर्ल्ड कप संपल्यानंतर टी10 लीगला (T10 League-Chris Gayle) यूएईमध्ये सुरुवात झाली आहे. शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात अबू धाबीची (Abu Dhabi) लढत बंगला टायगरशी (Bangla Tigers) झाली होती. या मॅचमध्ये सर्वांचं लक्ष युनिवर्स बॉस ख्रिस गेलकडे (Chris Gayle) सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) गेलला फारशी कमाल करता आली नव्हती. त्याच्या या खराब फॉर्ममुळे वेस्ट इंडिजला (West Indies) उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले होते. या वर्ल्ड कपनंतर गेल निवृत्त होणार अशी चर्चा रंगली होती. पण गेलने या सामन्यापूर्वी ‘मी कुठंही जाणार नाही.’ असं ट्विट करत निवृत्तीची शक्यता फेटाळून लावली.

गेल या मॅचमध्ये चौथ्या क्रमांकावर बॅटींगला आला होता. यावेळी त्याने मैदानावर येताच जोरदार फटकेबाजी सुरू केली. त्या आपल्या खेळीमध्ये 23 बॉलमध्ये नाबाद 49 रन काढले. यामध्ये 5 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. यावेळी गेलला दुसऱ्या बाजूने आयर्लंडचा (Ireland) बॅटर पॉल स्टर्लिंगनं (Paul Sterling) चांगली साथ दिली. त्यानेसुद्धा 23 बॉलमध्ये 59 रन काढले. यामध्ये 6 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. (T10 League-Chris Gayle)

 

गेल आणि स्टर्लिंगच्या या तडकाफडकी खेळीने टीम अबू धाबीनं निर्धारित 10 ओव्हर्समध्ये 4 खेळाडू गमावत 145 पर्यंत मजल मारली.
यानंतर या आव्हानांचा पाठलाग (T10 League-Chris Gayle) करताना बंगाल टायगरची सुरुवात काही खास झाली नाही.
त्यांचा कॅप्टन फाफ ड्यू प्लेसिस (Faf Du Plessis) शून्यावर आऊट झाला.
यानंतर बंगाल टायगरचा डाव गडगडला आणि त्यांना 10 ओव्हर्समध्ये 8 खेळाडूंच्या मोबदल्यात 105 रन करता आले.

 

Web Title :- T10 League-Chris Gayle | t10 chris gayle hirs quick knock for team abu dhabi against bangla tigers T10 League Chris Gayle marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Aurangabad Crime | मालमत्तेच्या वाटणीवरून मुलगा आणि सुनेनं केलेल्या मारहाणीत बापाचा मृत्यू; प्रचंड खळबळ

Honey Trap | कोल्हापूरचा व्यापारी अडकला हनीट्रॅपमध्ये; सव्वातीन कोटी उकळले, फॅशन डिझायनर महिलेसह दोन सराफांना अटक

R Ashwin | आर. अश्विननं लागोपाठ 5 व्या सामन्यात केला ‘हा’ मोठा कारनामा