T20 World Cup 2022 | धोनीसारखा खेळतोय हा टीम इंडियाचा खेळाडू, विश्वचषक स्पर्धेत ठरू शकतो किंगमेकर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आजपासून ऑस्ट्रेलियात विश्वचषक स्पर्धेला (T20 World Cup 2022) सुरुवात होणार आहे. या विश्वचषकादरम्यान (T20 World Cup 2022) अनेक माजी खेळाडू आपले भाकीत वर्तवत आहेत. त्यामध्ये आता टीम इंडियाचा माजी खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) याने टीम इंडियाच्या एका खेळाडूची तुलना धोनी (MS Dhoni) बरोबर केली आहे. त्या अष्टपैलू खेळाडूचे नाव आहे हार्दिक पांड्या (Hardik Pandya).

 

हार्दीक पांड्या सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तो फलंदाजी आणि गोलंदाजी चांगली करीत असल्यामुळे यंदाच्या स्पर्धेत त्याच्याकडून संघाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. मागच्या दोन मालिकेत हार्दीक पांड्याने चांगली कामगिरी केली आहे.
त्याचबरोबर सराव सामन्यात सुद्धा पांड्याने चांगली कामगिरी केली आहे. सुरेश रैनाने हार्दीक पांड्याच्या या कामगिरीची प्रशंसा केली आहे.

विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्‍व के.),
दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

 

Web Title :- T20 World Cup 2022 | playing like dhoni this team india player will wash the bowlers in the world cup

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena | शिंदेचा वापर शिवसनेविरूद्ध ’कॉन्ट्रॅक्ट किलर’ प्रमाणे, त्यांच्या अधःपतनाची ही सुरुवात, कुठेतरी ब्रेक लावायला हवा

MNS Sandeep Deshpande | मनसेचा शिवसेनेवर प्रश्नांचा भडीमार, सहानुभूतीवर मतं मागू नका, कामांच्या मुद्द्यावर मागा

Ambadas Danve | अंबादास दानवेंचा भाजपला इशारा, म्हणाले-‘हीच शिवसेना आणि मशाल तुम्हाला…’