T20 World Cup | Virat Kohli ने ट्वेंटी-20 क्रिकेटमधून निवृत्त व्हावे; Shoaib Akhtar ने मांडले मत, सांगितले हे कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – T20 World Cup | भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यात विराट कोहलीने पाकची जोरदार धुलाई केली. विराट व हार्दिक पांड्याने पाकिस्तानचा तोंडचा घास पळवला. हा पराभव पाकिस्तानी चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे. आता पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) म्हटले आहे की, विराटने (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमधून (T20 World Cup) निवृत्ती घ्यावी. याचे कारणही शोएबने दिले आहे.

शोएब अख्तरने त्याचा यूट्यूब चॅनल (YouTube Channel) रावळपिंडी एक्स्प्रेसमध्ये (Rawalpindi Express) म्हटले आहे की, पाकिस्तानविरुद्धची विराट कोहलीची नाबाद 82 धावांची खेळी सर्वोत्तम होती. पाकिस्तानविरुद्धची विराटची ही आयुष्यातील सर्वोत्तम खेळी होती आणि तो अशी खेळी करू शकला कारण, त्याचा स्वतःवर विश्वास होता.

शोएबने म्हटले, विराटने दणक्यात पुनरागमन केले. पण, त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमधून (T20 World Cup)  निवृत्त्व (Retirement) व्हावे, ही माझी इच्छा आहे. कारण, तो त्याची संपूर्ण एनर्जी ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये खर्ची घालत आहे. पाकिस्तानविरुद्ध तो ज्या प्रकारे खेळला, त्या वेगाने तो वन डे क्रिकेटमध्ये (ODI Cricket) तीन शतकं झळकावू शकतो.

तो पुढे म्हणाला, तीन वर्ष त्याचा फॉर्म नव्हता, त्याच्या धावा होत नव्हत्या. कर्णधारपदावरून त्याला काढले गेले
आणि अनेक लोक त्याच्याबद्दल बरेच काही बोलत होते. लोकांनी त्याच्या कुटुंबियांनाही यात ओढले,
परंतु तो गप्प राहून सराव करत राहिला. त्याने सर्व ताकद पाकिस्तानविरुद्ध वापरली आणि दिवाळीच्या
पूर्वसंध्येला चौकार-षटकारांची आतिषबाजी केली.

ट्वेंटी-20 क्रिकेट आणि त्यात पाकिस्तानविरुद्धचा सामना पुनरागमनासाठी योग्य आहे, हे तो ठरवूनच मैदानावर
उतरला होता. किंग इज बॅक आणि मोठ्या जोशात तो आला. त्याच्यासाठी मी खूप आनंदी आहे.
तो दिग्गज क्रिकेटपटू आहे, असे शोएब म्हणाला.

Web Title :- T20 World Cup | t20 world cup pakistans former star pacer shoaib akhtar wants virat kohli to retire from t20 internationals

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IPS Officer Rashmi Shukla | रश्मी शुक्ला यांची राज्यात पुन्हा नियुक्ती होणार? पोलीस नेतृत्व बदलाबाबत देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं….

CM Eknath Shinde Ayodhya Visit | जय श्रीराम! CM एकनाथ शिंदे सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार

Hindustan Unilever (HUL) | ‘हे’ शॅम्पू वापरणे ताबडतोब बंद करा, कॅन्सरचा धोका असल्याने कंपन्याने उत्पादने घेतली मागे