T20 World Cup | दिनेश कार्तिकला खाली बसवून ‘या’ खेळाडूला खेळवा, विरेंद्र सेहवागने दिला टीम मॅनेजमेंटला सल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या ऑस्ट्रेलियामध्ये (Austrelia) टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup) सुरु आहे. या वर्ल्डकपमध्ये दिनेश कार्तिककडून (Dinesh Kartik) अपेक्षित कामगिरी झालेली नाही. आधी पाकिस्तान त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) दिनेश कार्तिक फ्लॉप ठरला. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 15 चेंडूत फक्त 6 धावा केल्या. कार्तिकला या मॅचमध्ये दुखापत झाली. त्यामुळे तो पुढची मॅच खेळेल कि नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान दिनेश कार्तिकबद्दल भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) एक मोठे विधान केले आहे. “ऑस्ट्रेलियन विकेट्सवर ऋषभ पंतपेक्षा (Rishabh Pant) दुसरा चांगला पर्याय नाही. दीपक हुड्डाच्या (Deepak Hooda) जागी पंतला संधी दिली असती, तर त्याने अधिक चांगली कामगिरी केली असती” असे सेहवागने म्हंटले आहे. (T20 World Cup)

 

काय म्हणाले सेहवाग?
“पहिल्या दिवसापासून पंत टीममध्ये हवा होता. तो तिथे टेस्ट क्रिकेट खेळला आहे. वनडे मॅचेस खेळलाय.
त्याने त्या ठिकाणी परफॉर्म केला आहे. दिनेश कार्तिक ऑस्ट्रेलियात कधी खेळला? ही काही बँगलोरची विकेट नाही.
आज हुड्डाच्या जागी पंतला खेळवायला पाहिजे होतं. त्याला तिथे खेळण्याचा अनुभव आहे.
त्याने गाबाची घमेंड मोडली आहे. मी फक्त सल्ला देऊ शकतो. बाकी सर्व मॅनेजमेंटच्या हातात आहे” असे सेहवाग म्हणाला आहे. (T20 World Cup)

पंतचा ऑस्ट्रेलियामधील रेकॉर्ड
ऑस्ट्रेलियात ऋषभ पंतचा टेस्ट रेकॉर्ड कमालीचा आहे. त्याने तिथे 7 सामन्यात 62 पेक्षा जास्त सरासरीने 624 धावा ठोकल्या आहेत.
यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. टी 20 मध्ये त्याने दोन इनिंगमध्ये फक्त 20 धावाच केल्यात.
पंतच टी 20 फॉर्मेटमधील प्रदर्शन त्याची कमकुवत बाजू आहे. त्यामुळेच तो प्लेइंग इलेव्हन बाहेर आहे.

 

Web Title :- T20 World Cup | virender sehwag big statement on dinesh karthik rishabh pant india vs south africa ind vs sa t20 world cup 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bigg Boss Marathi 4 | बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच योगेशने साधला किरण मानेंवर निशाणा; म्हणाला कि….

KRK ने यावेळी चक्क सलमान खानची मागितली माफी, काय आहे नेमके प्रकरण?

Rishab Shetty | ‘कांतारा’ चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक अभिनेता ऋषभ शेट्टीने केलं ‘हे’ मोठे वक्तव्य