Taapsee Pannu | “मी अजून प्रेग्नंट नाही…”; चाहत्याच्या प्रश्नावर तापसीचे स्पष्ट उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन – थप्पड फेम अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनेक चित्रपटांमधून तापसीने तिच्या अभिनय कौशल्याची ओळख पटवून दिली आहे. तापसीचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. तिच्या जीवंत अभिनयाचे अनेक लोक कौतुक देखील करत असतात. तापसीने सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससोबत ‘आस्क मी एनीथिंग’ (Ask Me Anything Celebrity Session) या सेशनमधून संवाद साधला. यावेळी चाहत्याने तापसीला (Taapsee Pannu) तिच्या लग्नाबाबत प्रश्न केला. यावेळी तापसीने दिलेल्या उत्तराने सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली.

 

 

 

अभिनेत्री तापसी पन्नू हिने सिनेविश्वामध्ये अभिनयाच्या बळावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तापसी अनेक दिवसांपासून सुट्टीवर गेली होती. लागोपाठ शुटिंगमध्ये व्यस्त असलेल्या तापसीने काही दिवस सोशल मीडिया व कामापासून ब्रेक घेतला होता. तापसी आता सुट्टीवरुन परतली आहे. त्यानंतर तिने सोशल मीडियावर ‘आस्क मी एनीथिंग’ (Ask Me Anything With Taapsee) हे सेशन घेतले. यामध्ये तिने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर दिलं. तापसी अनेकदा बोल्ड अवतारामध्ये दिसते (Taapsee Pannu Bold Photo) तिच्या उत्तरामध्येही बोल्डनेस दिसून येतो. तिला चाहत्याने लग्न कधी करणार, असा सवाल केला. यावेळी तापसीने दिलेल्या उत्तराने सिनेविश्वाचे लक्ष तिच्याकडे गेले.

 

 

 

लग्न कधी करणार ? अशा चाहत्याच्या प्रश्नावर तापसीने उत्तर दिले की “मग माझं लग्न कधी होणार आहे? तर मी अजून प्रेग्नंट नाहीये. त्यामुळे मी आत्ता लग्न (Taapsee Pannu Marriage) करत नाहीये, पण करेन तेव्हा तुम्हाला नक्की सांगेल.” या उत्तरावरुन सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली. अभिनेत्री तापसी पन्नू ही बॅडमिंटनपटू मॅथिअस बो (Mathias Boe) याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ती तिचा बॉयफ्रेंड (Taapsee Pannu Affair) व बहिणीसोबत व्हेकेशनला गेली होती.

 

अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) ही नेहमी तिचे मत स्पष्टपणे मांडत असते. यावेळीही तिने फॅन्सला तिचे खरे मत सांगितले आहे. यापूर्वी देखील तापसीला अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा देखील तापसीने सांगितले होते की तिला जेव्हा बाळ हवे असेल तेव्हाच ती लग्न करणार असल्याचे सांगितले होते. ती म्हणाली होती की, “मला मुले हवी असतील तेव्हाच मी लग्न करेन. मला लांबलचक लग्न नको आहे.” असे तापसीने सांगितले होते. अभिनेत्री तापसी पन्नू हिने पिंक (Pink), बदला (Badla), थप्पड (Thappad), जुडवा 2 (Judwaa 2) या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मागच्या वर्षी तापसी पन्नूने लूप लपेटा (Loop Lapta), मिशन इम्पॉसिबल (Mission Impossible),
शाबाश मिठू (Shabaash Mithu), दोबारा (Dobara), तडका (Tadka) आणि ब्लर (Blur) असे लागोपाठ चित्रपट दिले आहेत.
लवकरच ती अभिनेता शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) डंकी (Dunki) चित्रपटामध्ये झळकणार आहे.
पहिल्यांदा शाहरुख व तापसी स्क्रीन शेअर करणार आहेत.

 

 

Web Title :  Taapsee Pannu | did taapsee pannu taunt these bollywood actresses regarding marriage i am not pregnant

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा