तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना सादच्या अडचणीत वाढ, सदोश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

ADV

नवी दिल्ली : वृत्तंसंस्था – तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी साद यांच्यावर आणखी नवं कलम लावलं आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. मरकजमध्ये गर्दी जमवून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी साद यांच्यावर आधीच गुन्हे दाखल करण्यात आले होते, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. मौलाना साद यांच्या दोन नातेवाईकांना कोरोना झाला आहे. त्यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह अल्याचेही सांगण्यात येत आहे. हे नातेवाईक उत्तर प्रदेशातून दिल्लीत मरकजमध्ये आले होते.

मार्च महिन्यात दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या कार्यक्रमात देश विदेशातील हजारो लोक जमले होते. देशात लॉकडाऊनची स्थिती असताना एवढ्या लोकांना मशिदीत ठेवल्यामुळे देशात खळबळ उडाली होती. या कार्यक्रमाला देशातून अनेक प्रचारक आल्याने तेथील लोकांनी कोरोनाची लागण झाली. कार्यक्रमानंतर हे लोक देशातील विविध भागात गेले. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली. कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर साद हे बेपत्ता झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

ADV

देशात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. देशामध्ये दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत आहे. देशात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 11 हजार 993 वर पोहचली आहे. तर 392 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1344 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.