अभिनेत्री तब्बूचं Instagram अकाऊंट हॅक ! चाहत्यांना केलं Alert

आजवर अनेक सेलेब्रिटींचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बॉलिवूड ॲक्ट्रेस तब्बू (Tabu) हिचंही इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झालं आहे. खुद्द तब्बूनं याबाबत माहिती दिली आहे. तिनं तिच्या फॉलोवर्सला अलर्ट केलं आहे. तिनं असं अपीलही केलं आहे की, तिच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करून नये.
तब्बूनं शेअर केली इंस्टा स्टोरी
तब्बूनं तिच्या इंस्टा स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. यातून तिनं फॉलोवर्ससाठी एक मेसेज दिला आहे. यात ती लिहिते की, हॅक अलर्ट, माझं अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. माझ्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या कोणत्याही लिंकवर कृपया क्लिक करू नये असंही तिनं आवर्जून सांगितलं आहे.
— TimePass (@TimePassTalks) January 18, 2021
तब्बूची ही इंस्टा स्टोरीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी तिच्या इंस्टा स्टोरीचा स्क्रीनशॉट काढून तो शेअरही केला आहे.
तब्बूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची जवानी जानेमन सिनेमात काम करताना दिसली होती. या सिनेमात सैफ अली खान आणि अलाया फर्निचरवाला यांच्या प्रमुख भूमिका होत्या. लवकरच ती आता हॉरर कॉमेडी सिनेमा भूल भुलैया 2 मध्ये काम करताना दिसणार आहे. या सिनेमात कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी प्रमुख भूमिकेत आहेत. अनीस बज्मी सिनेमाचं डायरेक्शन करत आहेत.