Talegaon Chakan Highway Accident | खड्डा चुकवण्याच्या नादात तरुणाने गमावला जीव; थेट टँकरखाली चिरडला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Talegaon Chakan Highway Accident | पुण्यातील (Pune News) मावळ तालुका परिसरात अपघात (Accident) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यावर खड्डे चुकवण्याच्या नादात गॅस टँकरने (Gas Tanker) धडक दिल्याने तरुणाचा चाकाखाली सापडून जागीच मृत्यू (Died) झाला आहे. हा भीषण अपघात तळेगाव चाकण राष्ट्रीय महामार्गावर (Talegaon Chakan Highway Accident) असलेल्या इंदोरी टोलनाक्याजवळ झाला आहे. जितेंद्र रजनीकांत माजदूम (Jitendra Rajinikanth Majdoom) (रा. कोल्हापुर) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

याबाबत माहिती अशी की, मृत जितेंद्र हा वासुली फाटा येथे एका खाजगी कंपनीत काम करत होता. जितेंद्र आणि त्याचा मित्र विजय ढाकणे (Vijay Dhakane) हे दोघे दुचाकीवरून जात होते. यावेळी रस्त्यावर पडलेला खड्डा चुकवताना पाठीमागून येणारा गॅस टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अचानक टँकरची धडक बसल्यामुळे दुचाकी चालवत असताना नियंत्रण सुटले आणि दोघेही खाली कोसळले.

 

त्यावेळी जितेंद्र हा गॅस टँकरच्या चाकाखाली चिरडला गेल्याने दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, या अपघातात त्याचा मित्र विजय हा थोडक्यात बचावला आहे.
परंतु डोळ्यादेखत आपल्या मित्राचा प्राण गेल्याने विजयला मोठा धक्का बसला आहे.
या घटनेचा अधिक तपास तळेगाव आंबी एमआयडीसी पोलीस (Talegaon Ambi MIDC Police) करीत आहेत.

 

Web Title :- Talegaon Chakan Highway Accident | young man crushed by tanker on talegaon chakan national highway at maval pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा