भोकर : तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा

भोकर : माधव मेकेवाड

पंचायत समिती कार्यालयाकडून तालुक्यातील सुमारे ४५ गुणवंत शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात  येणार असून त्याचे वितरण  आज ( दि.२८ ) माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते  होणार आहे .

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’50e5570b-c211-11e8-8fdc-3dbd7e92aca3′]

शैक्षणिक वर्ष सन २०१३-१४ पासून आजतागायत तालुक्यात गुरु गौरव पुरस्कार वितरणास ब्रेक होता इतके वर्ष ब्रेक का?  हा प्रश्न  अनुत्तरीय आहे. दरम्यान  पं.स. चे विद्यमान सभापती झीमाबाई चव्हाण, उपसभापती सुर्यकांत बिल्लेवाड , व नाम फाऊंन्डेशनचे इंजि. विश्वांभर पवार यांनी या प्रकरणी विशेष पुढाकार घेऊन  आमदार अमिताताई चव्हाण यांच्या माध्यमातून  शिक्षकांच्या सन्मानाचा  प्रश्न अखेर मार्गी लावला. सन २०१३ -१४ ते सन २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षातील पुरस्काराचा खंड भरून काढत  तालुक्यात उत्कृष्ठ कार्य करत असलेल्या शिक्षकांचा सन्मान पंचायत समिती कार्यालयाकडून केला जात आहे आज शुक्रवार ( दि. २८ ) रोजी जिल्हयाचे  खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल , श्रीफळ, सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र देऊन गुणवंत आदर्श शिक्षकांचा गौरव  होणार आहे.

नरेंद्र मोदींना ‘चॅम्पियन आॅफ द अर्थ’ पुरस्काराचा मान

आयोजीत कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आ. अमिताताई चव्हाण, आ. राम पाटील रातोळीकर, आ. अमर राजुरकर , जि.प.  अध्यक्षा शांताबाई पवार पा.जवळगावकर, शिक्षण समिती सभापती माधवराव मिसाळे गुरुजी, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे आदी सह अन्य दिग्गज मंडळी आवर्जून उपस्थित राहणार आहेत. बायपास रोडवरील ओम लॉन्स येथे सायं ०३ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील शिक्षण प्रेमी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गट शिक्षणाधिकारी डी.जी. पोहणे यांनी केले आहे.

[amazon_link asins=’9332551731,9312146378′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’10ebfbac-c216-11e8-ab27-a5f0d6c4c244′]

You might also like