#Video : ‘बाहुबली ३’ चित्रपटाचे निर्देशन ‘या’ निर्मात्याने केले पाहिजे : तमन्ना भाटिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – खामोशी चित्रपट प्रदर्शित होताच बॉलिवूड आणि साउथची अभिनेत्री तमन्ना भाटियाने एका मुलाखतीत सांगितले की, जर बाहुबली ३ आला तर त्या चित्रपटाचे निर्देशन फक्त एस एस राजामौली करतील. बाहुबली दोन्ही चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर प्रेक्षक पुढच्या सीरीजची वाट पाहत आहे.

चित्रपट ‘खामोशी’ १४ मे ला प्रदर्शित झाला. याच दरम्यान एका मुलाखतीत तमन्नाने सांगिलते की, चित्रपट बाहुबलीचा तिसरा पार्ट कधीच बनणार नाही आणि जर बनला तर याचे निर्देशन एस एस राजामौली यांनी केले पाहिजे. बाहुबलीच्या दोन्ही सीरीजचे निर्देशन एस एस राजामौली यांनी केले होते. बाहुबलीच्या पहिल्या पार्टमध्ये तमन्ना दिसून आली. या दोन्ही पार्टला प्रेक्षकांची प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

याच्या तिसरी सीरीज येण्याची प्रेक्षक वाट पाहत आहे. या तिसऱ्या पार्टची माहिती अजून समजली नाही. याचा जर तिसरा पार्ट प्रदर्शित झाला तर तो ही सुपरहिट ठरेल. कारण या दोन्ही सीरीजमध्ये प्रसिद्ध अभिनेता प्रभास याने शानदार अभिनय केला आहे. अभिनेता प्रभास याचा आगामी चित्रपट ‘साहो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येत आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रभाससोबत श्रद्धा कपूरने देखिल काम केले आहे.

 

तमन्नाने आपल्या अभिनयाने अनेकांच्या मनात घर केले आहे. आता तमन्ना बॉक्स ऑफीसवर आपला जलवा कसा दाखवेल ते पाहणे उत्सुकतेचे ठरेल. अभिनेता प्रभास साहो चित्रपटात कसे काम करतो हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कळेल.

Tamannaah Bhatia on Baahubali 3: खामोशी के रिलीज होते ही तमन्ना भाटिया ने कहा- अगर बाहुबली 3 आती है तो उसका निर्देशन एस एस राजामौली ही करेंगे

सिनेजगत

#Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित…

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ

हे काय, अरबाज आणि मलायका पुन्हा ‘एकत्र’ ?

ती माझ्या पती’सोबत’ होती, तिला मुलगी कशी म्हणू ; आदित्य पांचोलीच्या पत्नीचा कंगनावर ‘निशाणा’

 

Loading...
You might also like