तब्बल ७ महिने ३०० किमीचा प्रवास करून कर्नाटकात पोहोचली ४२० टन वजनाची ‘ती’ मूर्ती

तामिळनाडू : वृत्तसंस्था – तामिळनाडूमध्ये बनवण्यात आलेली एक मूर्ती सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तामिळनाडूत बनवण्यात आलेली हि मूर्ती जवळपास ३०० किलोमीटरचा प्रवास करून कर्नाटकातील एका मंदिरात स्थापित करण्यात येणार आहे. या मूर्तीचे वजन ४२० टन इतके असून या मूर्तीची वाहतूक करण्यासाठी २४० चाकांचे एक खास वाहन तयार करण्यात आले असून कर्नाटकातील एजीपुरा येथे त्या मूर्तीला नेण्यासाठी सात महिन्यांचा कालावधी लागला आहे.

६४ फूट लांब आणि २५ फूट रुंद हि मूर्ती हिंदू धर्मातील पहिल्या प्रमुख १० देवतांपैकी एक असलेले भगवान विश्वरूपम यांची आहे. या पुतळ्याबद्दल डॉ. सदानंद सांगतात की, ही विश्वरूपम सर्वोच्च देव आहे ज्यांनी वेगवेगळ्या वेळी हिंदूंना मदत केली आहे. हिंदु लोकांमध्ये एकता नाही कारण आम्ही इतर देवतांवर विश्वास ठेवतो. म्हणून मी सर्व हिंदू देवतांच्या मूर्ती बनवण्याचा निर्णय घेतला. सदानंद यांनी ७ वर्षांपूर्वी या मूर्तीची उभारणी करण्याचा संकल्प केला होता. यासाठी त्यांना २.८ कोटी रुपये खर्च आला.

तिरुवन्नामलाईचे कलेक्टर के.एस कंदासामी यांनी या मूर्तीच्या वाहतुकीविषयी माहिती देताना सांगितले कि, या मूर्तीची ने आन करण्यासाठी या भागातील रस्ते रुंद करण्यात आले. त्याचप्रमाणे रस्त्यात येणारी घरे तसेच दुकाने तोडून मूर्तीच्या वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करून देण्यात आला.

२ राज्य आणि ४ जिल्हयातून प्रवास करून हि मूर्ती कर्नाटकातील एजीपुरा येथे पोहोचली असून उरलेले ४०० मीटरचे अंतर पार करण्यासाठी आणखी ४ दिवस लागतील. कारण त्या भागात विजेचे मोठे खांब असून त्यामुळे या मूर्तीच्या वाहतुकीला अडथळा होत आहे. २०१२ पासून या मूर्तीचे निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु होते, मात्र यात सातत्याने अडचणी येत होत्या.

सदानंद म्हणाले की, २०१२ मध्ये तिरुवन्नमलाईमध्ये खूप शोधाशोध केल्यानंतर अखेर त्यांना दगड सापडला होता. सर्व प्रकारच्या मंजुऱ्या मिळविण्यासाठी दोन वर्षे गेली. २०१७ मध्ये, मूर्तीच्या विरूद्ध मद्रास उच्च न्यायालयात पीआयएल दाखल केली होती, त्यानंतर नोव्हेंबर २०१८ मध्ये हि मूर्ती अखेर तयार होऊन तिच्या वाहतुकीला सुरुवात झाली होती. त्याचबरोबर तामिळनाडूमधील लोकांनी देखील या मूर्तीसाठी दगड देण्यास विरोध केला होता, कारण कर्नाटकच्या सरकारने त्यांना कावेरी नदीचे पाणी दिले नव्हते. त्याचबरोबर मूर्ती कर्नाटकमध्ये आल्यानंतर तेथील नागरिकांनी मोठ्या उत्साहात तिचे स्वागत केले.