पोलीसनामा ऑनलाइन टीम : Tania Shroff | गेल्या अनेक दिवसांपासून बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टींची लेक अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाची चर्चा जोरात सुरू होती. नुकतेच हे दोघे लग्न बंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नातील फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत होते. आता या सेलिब्रिटी कपलची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या दोघांच्या लग्नासाठी चाहते प्रचंड उत्सुक होते. आता या दोघांच्या लग्नानंतर त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहेत. ते सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. (Tania Shroff)
यामध्ये अनेक फॅमिली फोटो सुद्धा समोर येत आहेत. या फॅमिली फोटोमधील एका व्यक्तीने मात्र आता सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे ती म्हणजे अहान शेट्टीची गर्लफ्रेंड. अथिया आणि केएल यांच्या लग्नात अनेक कलाकार मंडळींनी उपस्थिती लावली होती. त्यातच अहानच्या गर्लफ्रेंडने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अहान शेट्टी गेल्या अनेक वर्षापासून तानिया श्रॉफला डेट करत आहे. या लग्नसमारंभात तानियाने हजेरी लावत या लग्नात चार चांद लावले होते. तानिया एक फॅशन डिझायनर आणि इन्फ्लन्सर आहे. तानियाचे वडील हे एक बिझनेस मॅन आहेत. तानिया आणि अहान गेल्या अनेक वर्षापासून एकत्र दिसत होते. एवढेच नाही तर सोशल मीडियावर दोघेही एकमेकांसोबतचे रोमांटिक फोटो सतत शेअर करत होते.
आता तानियाने अथियाच्या लग्नात हजेरी लावल्याने हे दोघे देखील लवकरच लग्न बंधनात अडकणार का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित होत आहे. अहानने तडप या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तर तानिया (Tania Shroff) या लग्नात खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती. तानियाने परिधान केलेले कपडे ज्वेलरी सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत होते. यावेळी अथिया सोबतच तानिया देखील सेंटर ऑफ अट्रॅक्शन दिसत होती.
Web Title :- Tania Shroff | kl rahul athiya shetty wedding ahan shetty girlfriend tania shroff special presence in wedding
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Aurangabad Crime News | सुसाईड नोट लिहून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; औरंगाबादमधील घटना
Raigad District Bank Fire | रायगड जिल्हा बँकेला भीषण आग; कागदपत्रे एका क्षणात जळून खाक