औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – Aurangabad Crime News | औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये औरंगाबाद शहरातील जवाहरनगर परिसरात एका तरुणाने पत्र्याच्या घरात लोखंडी पाईपला ओढणीने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मुकेश नागोराव गाव्हदे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. यावेळी या तरुणाच्या खिशात एक सुसाईड नोट आढळून आली. या सुसाईड नोटवरून त्याने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र त्यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप समजू शकलेले नाही. (Aurangabad Crime News)
सुसाईड नोटमध्ये नेमके काय लिहिले?
मृत मुकेश हा औरंगाबादच्या जवाहरनगर परिसरात भाड्याने रूम घेऊन राहत होता. तो केटर्सचं काम करत होता. त्याचे मूळ गाव बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातील चोंडी हे आहे. त्याने औरंगाबादमध्ये राहत असलेल्या ठिकाणी ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांना मुकेशच्या खिशात एक सुसाईड नोट आढळून आली. यामध्ये ‘तू जो भी पायला असेल त्याच्या सोबत खूश रहा मी तुला कधी श्राप देणार नाही पिल्ली I love you.. sorry’ असा मजकूर लिहिला होता. (Aurangabad Crime News)
मुकेशच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला घातपाताचा संशय
या प्रकरणी मुकेशचा भाऊ लखन आणि नातेवाईकांनी मुकेशचा घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी तशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाबाबत अधिक तपास सुरू अल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Web Title :- Aurangabad Crime News | young mans extreme step from a love affair in aurangabad
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Solapur Crime News | पांगरी स्फोट प्रकरणी मुख्य आरोपी नाना पाटेकरला तमिळनाडूमधून अटक
- Chandrashekhar Bawankule | ‘राज्यातील पोटनिवडणुका बिनविरोधाची परंपरा ‘या’ नेत्यांनी जपावी..;’ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सर्वपक्षीय नेत्यांना साद
- Pune Crime News | पुणे विद्यार्थी गृहात गोंधळ घातल्याप्रकरणी 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल