काजोलच्या बहिणीला अमेरिकेत करावा लागला वर्णद्वेषाचा सामना

मुंबई : वृत्तसंस्था – अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि बी टाऊनच्या काही कलाकारांनंतर आणखी एका अभिनेत्रीला अमेरिकेत वर्णभेदाचा सामना करावा लागला आहे. काजोलची बहिण तनिषा मुखर्जीला न्यूयॉर्कमधील Jane Hotel NYC या ठिकाणी अशा प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे. तनिषाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट करत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. या प्रसंगाबाबत तिने ट्विट करत सांगितले, ती जागा, हॉटेल अत्यंत वाईट असून तिथे असणारे लोकही तितकेच वाईट आहे.

तनिषा CRY America charity gala या कार्यक्रमासाठी परदेशात गेली होती आणि ‘द जेन हॉटेल’ येथेच वास्तव्यास होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तनिषा आणि तिचे मित्रमंडळी त्या हॉटेलमध्ये पार्टी करत होते. क्लबमध्ये त्यांची धमाल सुरू असताना त्याचवेळी हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याकडून तिच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली. एवढंच नाही तर त्या हॉटेलमध्ये तनिषा आणि तिच्या मित्रमंडळींवर, ‘जिथून आलात तिथे परत जा’, अशा आशयाची टिप्पणीही करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या सर्व प्रसंगाची माहिती तिने हॉटेलच्या व्यवस्थापकांना देण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्या कडूनही काही सपोर्ट मिळाला नसल्याचे तनिषाने सांगितले.

या प्रसंगाविषयी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना, आपण अशा प्रकारच्या प्रसंगाचा पहिल्यांदाच सामना केल्याची प्रतिक्रिया तनिषाने दिली. तसेच अमेरिकेत पहिल्यांदाच अशा प्रकारे अवहेलनापूर्ण प्रसंगाला सामोरं गेल्याचा धक्का बसल्याचंही तिने सांगितले.

ह्याही बातम्या वाता –

बाहुबली चित्रपटातील ‘ही’ अभिनेत्री पॉर्न स्टारच्या भूमिकेत

धनगर आरक्षणाची कागदपत्रे कोर्टातून गायब

आयुष्यमान खुराणाने ‘या’ चित्रपटाची कथा चोरली ?

पैसे भरण्याची जबाबदारी असलेल्यानेच मारला ३१ लाखांवर डल्ला

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us