#MeToo : नाना पाटेकरांना ‘क्‍लीन चीट’ दिल्याने भडकली तनुश्री, केलं मुंबई पोलिसांबद्दल ‘गंभीर’ वक्‍तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. परंतु आता नाना पाटेकर यांच्याविरोधात पोलिसांना कोणताही पुरावा आढळून आला नाही. यानंतर मात्र या गुन्ह्यात काहीही तथ्य नाही असा अहवाल पोलिसांनी अंधेरी न्यायालयात सादर केला आहे.

पोलिसांकडून सादर झालेल्या अहवालाची न्यायालय पूर्ण तपासणी करून या प्रकरणी अंतिम निर्णय देण्यात येणार आहे. पोलिसांनी न्यायालयात बी समरी दाखल केली आहे. कोणतेही विरोधातील पुरावे समोर न आल्याने मीटू प्रकरणातून नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यानंतर यावर तनुश्री दत्ता भडकल्याचे दिसत आहे. तिने पोलिसांना भ्रष्ट म्हटले आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, तनुश्री दत्ता म्हणते की, “भ्रष्ट पोलीस फोर्स आणि न्यायव्यस्थेने अशा भ्रष्टाचारी माणसाला(नाना पाटेकर) क्लीन चीट दिली आहे ज्या नानांवर इंडस्ट्रीतील अनेक महिलांनी धमकावण्याचा आणि छळ केल्याचा आरोप केला आहे.”

पोलिसांनी न्यायालयात सादर केलेला अहवाल काय सांगतो ?

जो अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला आहे त्या अहवालात सांगण्यात आले आहे की, तनुश्रीने नानांवर खोटा खटला दाखल केला आहे. पुराव्याअभावी हा खटला खोटा खटला आहे असे अहवालात म्हटलं आहे. पोलिसांनी न्यायालयात जो अहवाल सादर केला आहे तो अहवाल म्हणजे बी समरी आहे. समरीचे एकूण तीन प्रकार आहेत.

ए समरी, बी समरी आणि सी समरी. ए समरी म्हणजे संबंधित प्रकरणाचाच पुरावा नाही, बी समरी म्हणजे खोटा खटला आणि सी समरीमध्ये एखाद्यावर चुकीचा गु्न्हा दाखल केल्याबाबतचा तपशील असतो. अशा प्रकारच्या समरी पोलिसांकडून न्यायालयात सादर केल्या जातात. पुरावा नसल्याने हा खटला खोटा आहे असे सांगत पोलिसांनी तनुश्री आणि नानांच्या प्रकरणात बी समरी दाखल केली आहे.

अशी आहे पुढील प्रक्रिया ?

सध्याच्या घडीला नाना पाटेकरांविरोधात कोणताही पुरावा नसल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी या अहवालानंतरही तनुश्री दत्तालाही एक संधी देण्यात येणार आहे. या सगळ्यावर तिचं काय मत असेल तेही विचारात घेतलं जाणार आहे.

तिच्या प्रतिक्रियेनंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. महत्त्वाची बाब अशी की, जर न्यायालयाने आदेश दिले तर या प्रकरणाचा तपास पुन्हा एकदा केला जाऊ शकतो. परंतु सध्या तरी नानांविरोधात पुरावे नाहीत हे मात्र स्पष्ट आहे.

सिने जगत – 

 

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका धक्‍कादायक वळणावर ; ‘चालतय की’ म्हणणारा राणा’दा’ ची ‘एक्झिट’

‘बेबी डॉल’ सनी लिओनी सुरू करणार ‘हा’ नवा ‘उद्योग’ !

#Video : ‘हे’ बॉलिवूडचे सुपरस्टार मिडिया समोर लपवितात ‘चेहरा’

Loading...
You might also like