तासगाव : चॉकलेटचे आमिष दाखवून बालकावर लैंगिक अत्याचार

तासगाव : पोलीसनामा ऑनलाईन

कुमठे (ता. तासगाव) येथे एका पाच वर्षीय बालकाला चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गावातीलच प्रदीप उर्फ अमोल गुंडा पाटील (वय 21, रा. कुमठे) याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करुन सांगली न्यायालयात उभे केले असता त्याला सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.
[amazon_link asins=’B07FQFQ5K1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’25e68266-9b2c-11e8-91fe-6b81cc8777ea’]

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रदीप याने मंगळवारी पाच वर्षीय बालकाला चॉकलेट देतो म्हणून घरात बोलावून घेतले. यावेळी प्रदीपच्या घरी कोणीच नव्हते. दरम्यान यानंतर घरातील शौचालयामध्ये नेवून पिडीत बालकावर लैंगिक अत्याचार केले. बालकाला त्रास होवू लागल्याने तो ओरडू लागला. यावेळी प्रदीपने त्याला शौचालयामध्ये कोंडून ठेवून त्याचे तोंड दाबले.

याप्रकरणी तासगाव पोलिसांनी प्रदीप याला तात्काळ अटक केली. बाललैंगिक अत्याचार अधिनियम 2012 अंतर्गत प्रदीपवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला सांगली न्यायालयात उभे केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके करीत आहेत.