Tata Group चे ‘हे’ शेअर्स गुंतवणूकदारांच्या पसंतीला, बक्कळ कमाई करण्याच्या तयारीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Tata Group | रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) या दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण असून रशिया कधीही युक्रेनवर हल्ला करु शकते असा इशारा अमेरिकेने (America) दिला आहे. या तणावामुळे बाजारात सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. मात्र, यामध्ये असे काही निवडक शेअर आहेत की ज्यांमध्ये गुंतवणूक (Investment) करुन तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. टाटा ग्रुपचे (Tata Group) हे शेअर्स सध्या गुंतवणूकदारांच्या रडारवर आहेत. ऑटोमोबाइल कंपनी (Automobile Company) टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये (Tata Motors Share) गुंतवणूकीची चांगली संधी उपलब्ध होत आहे. बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राजेश झुनझुनवाला (Rajesh Jhunjhunwala) यांच्या पोर्टफोलिओ मध्ये टाटा मोटर्सच्या शेअर्सचा मोठा वाटा असून ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने (JP Morgan) या शेअरवर गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

 

टाटा मोटर्सच्या शेअरवर सध्या गुंतवणूकदारांची नजर आहे. आता जेपी मॉर्गनने देखील या शेअरबाबत सल्ला दिला आहे. नुकतेच टाटा मोर्टर्सची उपकंपनी जेएलआरने (JLR) NVIDIA सोबत करार केला आहे. ग्राहकांना वाहनांमध्ये नेक्स्ट-जनरेशन ऑटोमेटेड ड्रायविंग सिस्टिम आणि AI-Enabled सर्विसेस देण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. सेफ्टी, ऑटोमेटेड ड्रायविंग आणि पार्किंग, ड्रायवर आणि Occupant मॉनिटरिंगसारख्या सुविधा सामिल होणार आहेत.

 

जेपी मॉर्गन ने टाटा मोटर्सच्या शेअर्ससाठी (Tata Group) रेटिंगमध्ये सुधार केले आहेत. शेअरवर 630 रुपयांचे लक्ष्य देण्यात आले आहे.
सध्याच्या किंमतीवरुन 30 टक्क्यांचा परतावा मिळणे अपेक्षित आहे. टाटा ग्रुप भारतीय इलेक्ट्रिक वाहनांच्या उदयोन्मुख बाजाराचे नेतृत्व करु शकतो.
त्यामुळे गुंतवणूकदार टाटा मोटर्सच्या शेअरवर लक्ष ठेवून आहेत.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Tata Group | tata group stock tata motors share price jp morgan revised rating and target rakesh jhunjhunwala invested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Arjun Sachin Tendulkar | ‘…म्हणून मी अर्जुन तेंडुलकरचे सामने पाहायला जात नाही’; सचिन तेंडुलकरने केला मोठा खुलासा

 

Maharashtra New DGP | वरिष्ठ IPS अधिकारी रजनीश सेठ राज्याचे नवे पोलीस महासंचालक

 

PPF Investment | … तर PPF खात्यात गुंतवणुकीशिवाय होईल मोठी कमाई, जाणून घ्या जबरदस्त फॉर्म्युला