Tata Motors ची जबरदस्त ऑफर ! दररोज 166 रुपयांत Tiago आणि 185 रुपयांत Altroz होणार तूमची

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय कंपनी टाटा मोटर्स लॉकडाउननंतर आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ग्राहकांना अनेक उत्तम ऑफर देत आहे. टाटा मोटर्सने बुधवारी six-month EMI holiday स्कीम लॉन्च केली. या योजनेचा फायदा टियागो, नेक्सन आणि अल्ट्रोस या निवडक मॉडेल्सवर उपलब्ध आहे. याअंतर्गत, ग्राहकांना 6 महिन्यांपर्यंत कोणताही ईएमआय भरावा लागणार नाही. यासह, 5 वर्षांच्या कर्जाची मुदत, शून्य डाउन पेमेंट आणि कारच्या ऑन-रोड किंमतीचे 100% फायनान्स समाविष्ट आहे.

कंपनी आपल्या विविध वाहन कर्ज भागीदारांसह मिळून आठ वर्षापर्यंतचे कर्जदेखील देत आहेत. या आकर्षक फायनान्स योजनेव्यतिरिक्त, कंपनी जुलैमध्ये आपल्या काही मॉडेल्सवर 65 हजार रुपयांपर्यंतची सूटही देत ​​आहे. टाटा मोटर्सने सांगितले की, मेच्या तुलनेत जूनमध्ये कारची विक्री चांगली होती.

Six-month EMI holiday स्कीम- या स्कीमअंतर्गत ग्राहक टाटा अल्ट्रोजला फक्त 5555 / महिन्याच्या म्हणजेच दररोज 185 रुपये ईएमआयवर घरी आणू शकता. त्याचप्रमाणे,टाटा नेक्सनला दररोज 250 रुपये आणि टिआगोला दररोज 166 रुपये म्हणजेच 4999 रुपये मासिक ईएमआय देऊन घरी आणता येईल. या ऑफर्स केवळ नेक्सन, अल्ट्रोज आणि टियागोवर दिल्या जात आहेत.

शून्य डाऊन पेमेंटवर खरेदी करता येईल वाहन –

टाटा मोटर्सनी सांगितले की, या योजनेअंतर्गत ग्राहक आता शून्य पेमेंट करू शकतात तसेच सहा महिने ईएमआयवरही सूट मिळेल, अर्थात 6 महिन्यांपर्यंत कोणताही ईएमआय भरावा लागणार नाही. केवळ मासिक व्याज द्यावे लागेल. पाच वर्षाच्या कर्जाच्या कालावधीसाठी 100 टक्के ऑन-रोड फंडिंग केले जाऊ शकते.

ही ऑफर करूर वैश्य बँक (केव्हीबी) च्या भागीदारी अंतर्गत ऑफर दिली जात आहे. या योजनेचा लाभ केवळ त्यांच्यासाठीच उपलब्ध आहे ज्यांचा पगार किंवा व्यवसाय यासाठी पात्र असेल. अनेक वित्तीय भागीदारांच्या सहकार्याने ते आठ वर्षांपर्यंतच्या कर्जाच्या कालावधीच्या ईएमआयवर परवडणारे, स्टेप-अप ईएमआय देत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.