बाळ टीबीग्रस्त असल्यास घ्या काळजी, करा ‘हे’ उपचार

पोलीसनामा ऑनलाईन टीम – भारतात दरवर्षी सुमारे दोन लाख लोकांना टी.बी.चा आजार होतो. यामध्ये ४०,००० हजार लहान मुले असतात. हा आजार कोणत्याही वयाच्या मुलांना होऊ शकतो. परंतु, बहुतांश हा १ ते ४ वर्षांच्या मुलांना जास्त होतो. कारण या वयात मुलांची रोग प्रतिकारशक्ती कमी असते. आईला टीबी झाला असल्यास ती जर दोन आठवड्यापासून टीबीची औषधे घेत असेल तरच ती बाळाला स्तनपान देऊ शकते. कारण टी.बी.ची औषधांची थोडी मात्रा आईच्या दुधातून बाळाला मिळते. अशा स्थितीत बाळाला स्तनपान करणे सुरक्षित असल्याचे तज्ज्ञ सांगातात.

जर मुलाने दोन आठवड्यापर्यंत सतत टीबीचे औषध घेतले असेल तर इन्फेक्शन पसरत नाही. त्यामुळे त्यास इतर मुलांसोबत खेळू द्यावे. त्यास सामान्य जीवन जगू द्यावे. यामुळे मुले तणावमुक्त होतील. टीबीच्या उपचारासाठी मुलांना वेगवेगळ्या औषधांचे मिश्रण असलेली एक टॅब्लेट कमीत कमी सहा महिन्यांपर्यंत द्यावी. कारण टीबीचे जिवाणू पूर्णपणे संपुष्टात येण्यासाठी एवढा वेळ लागतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुलाच्या जेवणाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

टीबीपासून बचाव करण्यााठी बाळाला जन्मानंतर सर्व लसी दिल्या पाहिजेत. जन्मानंतर कमीत कमी सुरुवातीच्या सहा महिन्यांपर्यंत बाळाला स्तनपान द्यावे. यानंतर प्रतिकारशक्ती चांगली होते आणि टीबीसारख्या आजारापासून त्याचा बचाव होतो. बाळाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. टी.बी.चे जीवाणू चारही बाजूंनी बंद, अडचण आणि अंधारात जास्त प्रमाणात असतात. अशा जागेत मुलांना ठेवू नये