काय सांगता ! होय, नशीब उघडलं अन् ‘ती’ महिला एका रात्रीत झाली ‘करोडपती’

पोलीसनामा ऑनलाइन – कोणाच्या नशिबात काय लिहलेलं असत हे कोणालाही ठाऊक नसत. आज श्रीमंत असणारा व्यक्ती एका रात्रीत गरीब होतो तर गरीब असणारा व्यक्ती रात्रीत श्रीमंत होतो. अशीच एक घटना सौदी अरेबियात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या महिलेसोबत घडली आहे. सौदी अरेबियात राहणाऱ्या या भारतीय वंशाच्या महिलेला लकीड्रॉमध्ये १ मिलियन अमेरिकी डॉलरची लॉटरी लागली आहे. ही भारतीय महिला दुबईच्या यजमान शहरात एका शाळेची मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे.

एक इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, कमलाठी दास नावाच्या महिलेने दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ येथे १५ जुलै रोजी एक लकी ड्रॉ काढला होता. ज्यात तिला १ मिलियन डॉलर्सची लॉटरी लागली आहे. ही शिक्षिका बऱ्याच वर्षांपासून युएई मध्ये राहत असून, अजमनामधील इंडियन हायस्कुलमध्ये मुख्याध्यपिका आहे. यासंदर्भात बोलताना शिक्षिकेने म्हटलं की, सध्याच्या काळात ही लॉटरी म्हणजे मोठ्या आशीर्वादापेक्षा काही कमी नाही. या पैशाचा लोकहितासाठी उपयोग करणार आहे. ज्या शाळेत ती प्राचार्य आहेत त्या शाळेसाठी काही पैसेही खर्च करणार असल्याचं त्या म्हणाल्या. १९९९ च्या सालानंतर दशलक्ष डॉलर्स जिंकणारी दास ही १६५ वी भारतीय नागरिक असल्याचं आयोजकांनी सांगितलं.

यापूर्वी दुबईमध्ये एका भारतीय ड्रायव्हरने एप्रिल महिन्यात १२ मिलियन दिरहॅम जिंकले होते. तर अरब अमिरातीतील एका भारतीयाने जानेवारीत अबूधाबीमध्ये सर्वात मोठ्या रफल बक्षिसाचे १२ मिलियन दिरहॅम जिंकले होते. तसेच २०१९ साली अबुधाबी येथे ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मेगा रफल ड्रॉमध्ये आठ भारतीयांनी १ मिलियन दिरहॅम जिंकले आहे.