Teacher Recruitment 2023 | रखडलेल्या शिक्षक भरतीला मिळाला मुहूर्त, लवकरच ३० हजार रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध होणार : दीपक केसरकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात शिक्षक भरती (Teacher Recruitment 2023) रखडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आता या भरतीला मुहूर्त मिळाला आहे. या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मोठी घोषणा केली आहे. शिक्षक भरतीसाठी २३ जिल्ह्यातील रिक्त पदांची लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, केसरकर यांनी म्हटले आहे. शिक्षकांच्या एकुण ३० हजार पदांसाठी भरती (Teacher Recruitment 2023) प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

शिक्षण परिषदेसाठी पुण्यात आले असताना दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली.
केसरकर म्हणाले, आतापर्यंत बिंदूनामावली आणि इतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेल्या २३ जिल्ह्यातील रिक्त पदांची
जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. राज्यात पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

२३ जिल्ह्यांतील रिक्त पदांच्या शिक्षक भरतीसाठी जाहीरात (Teacher Recruitment 2023) कधी प्रसिद्ध होणार
यासंदर्भात तारीख जरी अद्याप निश्चित केली नसली तरी यासंदर्भात तातडीची पावले राज्य सरकारकडून (State Government) उचलण्यात येत असल्याचे दिसत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदांची जाहीरात कधी प्रसिद्ध होणार याकडे हजारो उमेदवारांचे लक्ष लागलेले
असताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी संबंधीत वक्तव्य केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political Crisis | शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचे, सुनावणी पुन्हा लांबणीवर!

Sanjay Raut | संजय राऊतांची जहाल टीका, विधानसभा अध्यक्ष चोर आणि लफंग्यांचे सरदार की संविधानाचे रखवालदार, न्यायालयाने रोज त्यांना फासावर लटकवले पाहिजे