Teachers and Graduate Constituencies Election | विधानपरिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, 5 जागांसाठी प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा पणाला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Teachers and Graduate Constituencies Election | राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. औरंगाबाद, नागपूर, कोकण शिक्षक मतदारसंघाची तर नाशिक, अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक (Teachers and Graduate Constituencies Election) जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निर्णयानुसार 30 जानेवारी 2023 ला मतदान होणार आहे. तर 2 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. याबाबत 5 जानेवारी रोजी अधिसूचना काढली जाणार आहे.

पदवीधरचे दोन आणि शिक्षक मतदारसंघाच्या (Teachers and Graduate Constituencies Election) तीन जागांसाठी 12 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघ तसेच औरंगाबाद, नागपूर, कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणूक होणार आहे.

नाशिक मतदारसंघात काँग्रेसचे (Congress) सुधीर तांबे, अमरावती पदवीधरमध्ये भाजपचे (BJP) रणजीत पाटील आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) विक्रम काळे, कोकण शिक्षकमध्ये बाळाराम पाटील आणि नागपूरचे नागो गाणार हे दोन या अपक्ष आमदारांच्या मतदारसंघात निवडणूक जाहीर झाली आहे. आता या मतदारसंघात कोणता राजकीय पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार

काँग्रेसचे नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे स्नेही आणि युवक
काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांचे वडील सुधीर तांबे हे नाशिक पदवीधरचे आमदार आहेत.
त्यामुळे काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात निवडणूक जाहीर झाली आहे.
दोन वर्षांपूर्वी पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने विजय मिळवला होता.
त्यामुळे शिक्षक मतदारसंघात देखील विजय मिळवण्यासाठी राष्ट्रावदीचा प्रयत्न असेल.
तर अमरावती पदवीधरमध्ये भाजपने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच रणजीत पाटील यांना
उमेदवारी जाहीर झाली होती. त्यामुळे भाजपसाठी हा मतदारसंघ महत्त्वाचा आहे.

Web Title :- Teachers and Graduate Constituencies Election | maharashtra mlc election schedule declared for two graduates and three teachers constituency in maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shruti Haasan | श्रुती हासनने सिनेसृष्टी बद्दल केले ‘हे’ मोठे वक्तव्य; म्हणाली “मी कधीही दिखावा केला नाही…”

Uddhav Thackeray | त्यांची नजर वाईट आहे, त्यामुळे आरएसएसने काळजी घेण्याची गरज; मुख्यमंत्र्यांच्या आरएसएस कार्यालय भेटीवर उद्धव ठाकरेंचे वक्तव्य…