टीम इंडियाचा केरळला मदतीचा हात

नॉटींगहम : वृत्तसंस्था

केरळची भयावह पूरस्थिती पाहता देशभरातून केरळला मदत करण्यात येत आहे. खेळाडूंपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच केरळसाठी मदत उभारण्याचे आवाहनव काम केले आहे.. आता केरळच्या मदतीसाठी टीम इंडियाही पुढे आली आहे .

[amazon_link asins=’B076CJMNP6,B07D7DP4VR’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f8a99b48-a696-11e8-bd8c-034b13a9f33a’]

टीम इंडियाने आपला पहिला विजय केरळमधील पूरस्थितीत जीम गमावलेल्या नागरिकांना समर्पित केला आहे. तसेच टीम इंडियातील खेळाडूंनी आपले मानधनही केरळ्या पूरग्रस्तांसाठी मदतनिधी म्हणून देऊ केले आहे. टीम इंडियाकडून केरळसाठी १ कोटी २६ लाखांची मदत देण्यात आली आहे.

भारतीय संघ म्हणून आम्ही आजचा विजय केरळच्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्या देशवासियांना समर्पित करत आहोत. या महापुरात केरळमधील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला. अनेकांचे घरदार उद्धवस्त झाले आहे. त्यामुळे आम्ही केरळमधील आपतग्रस्तांसाठी जे शक्य होईल, ते करत असल्याचे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने सामना जिंकल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.