
Team India World Cup Jersey | वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची नवी जर्सी पाहिलीत का? दिसणार ‘हा’ खास बदल (व्हिडिओ)
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील महिन्यापासून मायदेशात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकसाठी (ICC ODI World Cup) टीम इंडियाच्या नवीन जर्सीचे (Team India World Cup Jersey) अनावरण करण्यात आले आहे. येत्या 5 ऑक्टोबर पासून ही मेगा स्पर्धा खेळवली जाणार आहे. या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी Adidas ने टीम इंडियाच्या नवीन जर्सीचे (Team India World Cup Jersey) अनावरण केले आहे. प्रसिद्ध भारतीय गायक रफ्तार यांनी गायलेल्या ‘3 का ड्रीम’ या गाण्याद्वारे बहुप्रतिक्षित जर्सी रिलीज करण्यात आली. ‘3 का ड्रिम’ हे लाखो चाहत्यांचे प्रतीक आहे जे त्यांच्या संघाला 1983 आणि 2011 नंतर तिसरा एकदिवसीय विश्वचषक जिंकताना पाहण्याचे स्वप्न पाहतात.
Adidas ने भारतात खेळला जाणारा वर्ल्डकप साजरा करण्यासाठी मेन इन ब्लू जर्सीमध्ये सुधारणा केली आहे. त्यांनी खांद्यावरील तीन पांढऱ्या पट्ट्यांच्या जागी चमकदार तिरंगा लावला आहे. BCCI लोगोमध्ये आता छातीच्या डाव्या बाजूला दोन तारे आहेत, जे भारताच्या एकदिवसीय विश्वचषक विजयाचे प्रतीक आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय खेळाडू दिसत आहेत. नव्या जर्सीचा (Team India World Cup Jersey) हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाचा शुभारंभ
भारतात होणारा विश्वचषकाचा पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीची लढत होणार आहे.
19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे.
विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.
भारत आणि पाकिस्तान हा हायहोल्टेज सामनाही अहमदाबाद येथेच 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
यंदाचा विश्वचषक दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Police | गणेश भक्तांसाठी पुणे पोलिसांकडून ‘गणेशोत्सव 2023 डिजिटल रोड मॅप’ लाँच (व्हिडीओ)