Whatsapp वर नंबर सेव न करता पाठवा मॅसेज; जाणून घ्या सोपा मार्ग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेक डेक्स- आपण सर्व मित्र आणि कुटुंबाशी संपर्कात राहण्यासाठी Whatsapp चा वापर करतो. असे अनेक प्रसंग आहेत, जेव्हा आपल्याला त्या संपर्कांना मॅसेज करावे लागतात, जे नंबर आपल्या Whatsapp कॉन्टॅक्टस यादीत सामील नसतात. साधारणपणे, Whatsapp च्या प्लॅटफॉर्मवर असे कोणतेही फिचर उपलब्ध नाही, ज्याद्वारे नंबर सेव न करता मॅसेज जाऊ शकेल. परंतू आज आम्ही तुम्हाला अशा खास युक्तीबद्दल माहिती देणार आहोत. त्याद्वारे आपण नंबर जतन न करता मॅसेज पाठवू शकता.

नंबर जतन न करता असा पाठवा संदेश
>> प्रथम तुमच्या मोबाईल अथवा डेस्कटॉपवर वेब ब्राऊजर उघडा.
>> आता https://api.whatsapp.com/send?phone=xxxxxxxxxx link कॉपी करून पेस्ट करा. पेस्ट करण्याआधी xxxxxxxxxx च्या जागी कंट्री कोडसह त्या युजरचा नंबर टाका, ज्याला तुम्ही मॅसेज करणार आहेत.
>>लिंकला ब्राऊजरमध्ये टाकल्यानंतर एंटर करा. आता खाली Message+911234567890 on Whatsapp असे लिहिले असेल. याच्या खाली Message लिहिला असेल.
>> जेव्हा तुम्ही Message वर क्लिक कराल, तेव्हा तुम्हाला Looks like you don’t have WhatsApp installed! DOWNLOAD or use WhatsApp Web असे लिहिलेले दिसेल. तुम्हाला वाटल्यास WhatsApp तुमच्या डेस्कटॉपवर डाउनलोड करू शकता अथवा WhatsApp Web वरून प्रवेश करू शकता.

टीप: तुमच्या माहितीसाठी सांगत आहोत की ही चॅट इतर चॅटप्रमाणे ऍंड टू ऍंड एन्क्रिप्टेड असेल. या युक्तीद्वारे एकावेळी केवळ एकच वापरकर्ता संदेश पाठविण्यास सक्षम असेल.

WhatsApp चे उत्तम फीचर
इन्स्टंट मेसेजिंग ऍप WhatsApp ने काही वेळापूर्वी म्यूट व्हिडीओ फीचर सादर केले आहे. या फीचरद्वारे वापरकर्ते व्हिडीओ पाठविण्यापूर्वी त्यांचे आवाज म्यूट करू शकतील. म्हणजेच जेव्हा दुसऱ्या युजर्सना व्हिडीओ मिळेल तेव्हा त्यामध्ये आवाज येणार नाही. WhatsApp गेल्या काही काळापासून म्यूट व्हिडीओ फीचरवर काम करीत होते.