BSNL कडून 4 नवीन ब्रॉडबॅन्ड प्लॅन लॉन्च, 300 Mbps च्या स्पीडनं मिळणार डाटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने जिओ आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी चार नवीन ब्रॉडबँड योजना सुरू केल्या आहेत. या योजना ४४९, ७९९ रुपये, ९९९ आणि १,४९९ रुपयांचे आहेत. या सर्व योजनांमध्ये ग्राहकांना कॉलिंगसह हाय स्पीड डेटा मिळेल. एवढेच नव्हे तर या ब्रॉडबँड योजनांसह ग्राहकांना डिस्नी प्लस हॉटस्टारचे सब्स्क्रिप्शनही दिले जाईल. बीएसएनएलच्या या नवीन ब्रॉडबँड योजनांबाबत जाणून घेऊया…

बीएसएनएलचा ४४९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन

या प्लॅनचे नाव फायबर बेसिक असे आहे. या योजनेत युजरला 30Mbps च्या वेगाने 3300GB डेटा मिळेल. जर युजर्सने वेळेपूर्वी डेटा संपवला, तर त्यांच्या प्लॅनचा स्पीड 2Mbps पर्यंत कमी केला जाईल. या व्यतिरिक्त या योजनेत युजर्सना अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जाईल.

बीएसएनएलचा ७९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन

या प्लॅनचे नाव फायबर व्हॅल्यू आहे. या योजनेत युजर्सना 100Mbps च्या वेगाने 3300GB डेटा मिळेल. तसेच युजर्सना या योजनेत लँडलाईन कॉलिंगची सुविधा दिली जाईल. तसेच ही योजना केवळ एका महिन्यासाठी घेतली जाऊ शकते.

बीएसएनएलचा ९९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन

या योजनेचे नाव फायबर प्रीमियम असे आहे. या योजनेत युजर्सना 200Mbps च्या वेगाने 3.3TB डेटा मिळेल. जर युजर्सनी वेळेपूर्वी डेटा संपवला, तर त्यांच्या प्लॅनचा स्पीड 2Mbps पर्यंत कमी केला जाईल. तसेच या योजनेत युजर्सना अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जाईल.

बीएसएनएलचा १,४९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन

या प्लॅनचे नाव फायबर अल्ट्रा असे आहे. या योजनेत ग्राहकांना 300Mbps च्या स्पीडने 4000GB डेटा मिळेल. तसेच अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जाईल. कंपनी ग्राहकांना डिस्नी प्लस हॉटस्टारचे सब्स्क्रिप्शन देखील देईल.

बीएसएनएलच्या नवीन ब्रॉडबँड योजनेशी संबंधित महत्वाची माहिती

बीएसएनएलने प्रमोशनल बेसिसवर नवीन ब्रॉडबँड योजनांना अशा टेलिकॉम सर्कलमध्ये उतरवले आहे, जिथे स्पर्धा अधिक आहे. या सर्व नवीन ब्रॉडबँड योजना १ ऑक्टोबरपासून ९० दिवसांसाठी वैध असतील. त्यानंतर कंपनी त्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकू शकते किंवा त्यांची उपलब्धता वाढवू शकते.