d2h नं सादर केली आकर्षक ‘ऑफर’, इतरांचं रिचार्ज केल्यावर मिळणार कॅशबॅकचा ‘लाभ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊनच्या या संकटामध्ये दूरसंचार कंपन्या त्यांच्या युजर्सला चांगल्या सुविधा पुरवित आहेत. मात्र, डीटीएच सेवा प्रदाता देखील मागे नाही ते देखील ग्राहकांच्या सोयीसाठी नवीन ऑफर देत आहेत. जेणेकरून त्यांना लॉकडाऊनमुळे सेटअप बॉक्स रिचार्ज करण्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. D2h देखील या उपक्रमात सामील झाला आहे. D2h ने ‘फ्रेंड्स अँड फॅमिली रिचार्ज’ ऑफर सादर केले आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही इतरांचे रिचार्ज केल्यावर कॅशबॅक मिळवू शकता.

D2h च्या ‘फ्रेंड्स अँड फॅमिली रिचार्ज’ ऑफरबद्दल बोलायचे म्हणले तर कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे. वेबसाइटवर स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, डी 2 एच रिचार्ज करताना आपल्या मित्रांना आणि कुटूंबियांना 10 टक्के कॅशबॅक मिळेल. रिचार्जसाठी तुम्हाला आरटीएन किंवा ग्राहक आयडीचा वापर करावा लागेल.

जर आपल्याला मित्राचे रिचार्ज करायचे असल्यास त्याकरिता आपल्याला डी 2 एच वेबसाइट किंवा अ‍ॅपवर जाऊन आपल्या मित्राचा ग्राहक आयडी प्रविष्ट करावा लागेल. यानंतर आपण सहज रीचार्ज करू शकता. तसेच, रिचार्जवर तुम्हाला 10 रुपयांचे कॅशबॅक मिळेल. हे कॅशबॅक पुढील 24 तासांच्या आत आपल्या खात्यात जमा होईल. रिचार्ज करण्यासाठी ही ऑफर खूप उपयुक्त ठरू शकते.

डी 2 एचने अलीकडेच त्याच्या एचडी आणि एसडी सेट टॉप बॉक्सच्या किंमतींमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. एचडी आणि एसडी सेट टॉप बॉक्सची किंमत 100 रुपयांनी कमी करण्यात आली असून आता एसडी सेट टॉप बॉक्सची किंमत 1,599 रुपये करण्यात आली आहे. कपातीनंतर एसडी सेट टॉप बॉक्स 1,499 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकते.