Oppo F15 चा पहिला सेल ! 20000 चा फोन 6000 पेक्षा कमी किंमतीत, खरेदीची ‘सुवर्ण’संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Oppo F15 हा फोन काही दिवसांपूर्वी भारतात लॉन्च करण्यात आला होता. यात 4000 एमएएच बॅटरी आणि क्वाड रियर कॅमेरा सारखे फीचर आहेत. सध्या यूजर्स बॅटरी लाइफ आणि कॅमेरा क्ल्वॉलिटीवर जास्त लक्ष देतात. त्यामुळे कंपन्या देखील यूजर्सच्या पसंतीने मोबाइलमध्ये फीचर्स देत आहेत. जर तुम्ही हा लेटेस्ट स्मार्टफोन खरेदी करु इच्छित असाल तर आज सेलमध्ये हा फोन उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

Oppo F15 चा पहिला सेल –
हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट Oppo India वर, ई-कॉमर्स वेबसाइट Amazon आणि Flipkart वरुन खरेदी करु शकतात. याची किंमत 19,990 रुपये आहे. हा फोन एकच वेरिएंटमध्ये उपलब्ध करुन दिलेला आहे. यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. या फोन लाइटनिंग ब्लॅक आणि यूनिकॉर्न व्हाइट कलरमध्ये उपलब्ध आहे. यासह ऑफर्स देखील देण्यात आल्या आहेत.

HDFC बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करुन तुम्ही 10 टक्के इंस्टंट डिस्काऊट मिळवू शकतात. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डचा वापर करुन 5 टक्के अल्टीमेट कॅशबॅक तुम्हाला उपलब्ध करुन दिली जाईल. तसेच 14,050 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. जर ग्राहकांना पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाली तर तुम्हाला फोन 5,940 रुपयात मिळेल. No Cost EMI देखील मिळेल.

Oppo F15 चे फीचर्स –
या फोनमध्ये 6.4 इंचचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले देण्यात येईल. कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शनसोबत या फोनचे पिक्सल रेजोल्यूशन 1080×2400 आहे. हा फोन ऑक्टा कोर मीडियाटेक हेलियो पी 70 प्रोसेसर आणि 8 जीबी रॅमसह सादर करण्यात येईल. यात 128 जीबी इंटरनल स्टोरेज असेल ज्यात 256 पर्यंत मेमरी कार्ड टाकून स्टोरेज वाढवता येईल. ड्यूअल सिम सपोर्टसह फोन अ‍ॅण्ड्राइड 9 पाय वर आधारित ColorOS 6.1.2 वर काम करेल.

यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचे प्रायमरी सेंसर 48 मेगापिक्सल असेल. दुसरा 8 मेगापिक्सल, बाकी दोन सेंसर्स 2 मेगापिक्सलच्या आहेत. तर सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा सेंसर कॅमेरा उपलब्ध करुन दिला आहे. फोनमध्ये 4000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. जी VOOC 3.0 फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह देण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like