Samsung Independence day Offer : स्वस्त किमतीत स्मार्टफोन, TV सह इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट खरेदीची संधी

नवी दिल्ली : कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने इंडीपेंडन्स डे ऑफरची घोषणा केली आहे. यामध्ये कंपनीच्या टीव्ही, फ्रिज, स्मार्ट अवन, वॉशिंग मशीन आणि एयर कंडीशनर च्या खरेदीवर अनेक प्रकारच्या ऑफर देण्यात येत आहेत. यामध्ये निवडक प्रॉडक्टच्या खरेदीवर 15% पर्यंत कॅशबॅक आणि 990 रुपयांच्या सुलभ हप्त्याचा समावेश आहे. या ऑफरचा फायदा ग्राहकांना 31 ऑगस्ट 2020 पर्यंत घेता येईल.

सॅमसंगने इंडीपेंडन्स डे ऑफरमध्ये क्यूएलईडी 8के टीव्ही खरेदीवर एक गॅलेक्सी एस20+ स्मार्टफोन मिळेल, ज्याची किंमत 77,999 रुपये आहे. या सोबतच, ग्राहकांना 10 वर्षांची नो स्क्रीन बर्न-इन वॉरंटी आणि निवडक क्यूएलईडी टीव्ही मॉडलवर पॅनलवर 3 वर्षांची वॉरंटी सुद्धा मिळेल. सॅमसंग स्मार्ट टीव्ही खरेदी करणार्‍या ग्राहकांना 9000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल आणि 43-इंच आणि त्यापेक्षा मोठ्या स्क्रीन साईजच्या मॉडलवर एक मासिक हप्त्याची सूट आणि 990 रुपयांनी सुरू होणार्‍या सोप्या ईएमआयची सुविधा दिली जाईल. सोबतच टीव्ही खरेदीवर जी5 चे एक महिन्याचे मोफत सब्सक्रिप्शन आणि जी5 प्रीमियम पॅकवर 30 टक्केची सूट दिली जात आहे.

सॅमसंगचा स्पेसमॅक्स फॅमिली हब रेफ्रिजरेटर खरेदी केल्यावर 37,999 रुपयांचे गॅलेक्सी नोट 10 लाइट मिळेल. सोबतच सॅमसंगच्या रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशिन खरेदीवर 15% पर्यंत कॅशबॅक मिळू शकते. 300 लीटर किंवा त्यापेक्षा जास्त स्टोरेजच्या रेफ्रिजरेटरवर एक मासिक हप्त्याची सूट आणि 990 रुपयांनी सुरू होणार्‍या सोप्या ईएमआयची सुविधा मिळेल.

रेफ्रिजरेटरचे डिजिटल इन्व्हर्टर कॉम्प्रेसर 10 वर्षाच्या गॅरंटीसह येतील, वॉशिंग मशिनमध्ये मोटरवर 12 वर्षांची आणि संपूर्ण मशिनवर 30 वर्षांची वॉरंटी मिळेल. ही ऑफर प्रीमियम रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनसाठी असेल. सॅमसंग एयर कंडीशनरच्या खरेदीवर 990 रुपयांनी सुरू होणार्‍या सुलभ ईएमआयची सुविधा मिळेल. सॅमसंगच्या विंड-फ्री एयर कंडीशनरवर 15% पर्यंत कॅशबॅक मिळेल. याच्याशिवाय अतिरिक्त कंडेन्सर आणि पीसीबी कंट्रोलरवर 5 वर्षांची वॉरंटी, निवडक एयरकंडीशनर मॉडलमध्ये फ्री इन्स्टॉलेशन आणि फ्री गॅस रिचार्जसह डिजिटल इन्व्हर्टर कॉम्प्रेसरवर 10 वर्षांची वॉरंटीसारखी सुविधा दिली जात आहे. 28 लीटर क्षमतेपेक्षा जास्त कनेक्शन स्मार्ट अवनच्या निवडक मॉडलच्या खरेदीवर एक मोफत बोरोसिल किट आणि मॅग्नेट्रोन वर 5 वर्षांच्या वॉरंटीसह सेरामिक अनामेल कॅविटीवर 10 वर्षांची वॉरंटी मिळेल.