भारतात ‘PUBG’चं ‘टूर्नामेंट’, तब्बल ‘१.५’ कोटीचे बक्षीस ; जाणून घ्या रजिस्ट्रेशनची संपूर्ण प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PUBG मोबाईल गेम डेवलपर कंपनी Tencent Game आणि PUBG. Corp. ने oppo या स्मार्टफोन कंपनीने मिळून PUBG Mobile India Tour 2019 या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे रिजनल फायनल भारतातील ४ शहरामध्ये होणार असून यात महाराष्ट्रातील पुण्याचा समावेश आहे. तर इतर शहरांमध्ये जयपूर, गुवाहटी आणि विशाखापट्टनम या शहरांचा समावेश आहे. ही स्पर्धा आज १ जुलै २०१९ रोजी म्हणजेच आजच होणार आहे. पुढील चार महिने या स्पर्धेअंतर्गत मॅच घेण्यात येतील. याचा ग्रांड फिनाले २० ऑक्टोबरला कोलकत्यात आयोजित केला जाईल.

कुठे कधी खेळण्यात येईल मॅच –

सर्वात पहिल्या फेजला रजिस्ट्रेशन फेज नाव देण्यात आले आहे. यात प्रत्येक खेळाडूला एंट्री करणे आवश्यक आहे. जयपूरसाठी रजिस्ट्रेशन १ ते १४ जुलैला होईल. तर गुवाहटी साठी १ ते २८ जुलै रजिस्ट्रेशन असेल. पुण्यासाठी १ जुलै ते ११ ऑगस्ट रजिस्ट्रेशन असेल. विशाखापट्टनमसाठी १ ते २५ ऑगस्ट रजिस्ट्रेशन असेल. रजिस्ट्रेशन साठी कोणतीही लिमिट असणार नाही.

ऑनलाइन प्लेऑफ –

ऑनलाइन प्लेऑफसाठी २००० टीम पुढे जातील, याचे आयोजन २९ जुलैला करण्यात येईल. जयपूरमध्ये प्लेऑफ राऊंड २९ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान असेल तर गुवाहटीसाठी प्लेऑफ राऊंड १२ ते २४ ऑगस्ट पर्यंत असेल. पुण्यासाठी प्लेऑफ राऊंड २६ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान असेल. तर विशाखापट्टनम येथे ऑनलाइन प्लेऑफ राऊंड ९ ते २१ सप्टेंबर असेल.

टूर्नामेंटसाठी १.५ कोटीचे बक्षीस –

या टूर्नामेंट साठी १.५ कोटी चे बक्षीस ठेवण्यात आले आहे. ग्रॅन्ड फिनाले मध्ये जिंकणाऱ्या टीमला ५० लाख रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे. दुसऱ्या क्रमांकावरील टीमला २० लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहे, तर तिसऱ्या क्रमांकावरील टीमला १० लाख रुपये बक्षीस रक्कम म्हणून देण्यात येणार आहे. तसेच यात विशेष खेळी करणाऱ्या खेळाडूंना देखील बक्षीस देण्यात येणार आहे. त्यांची रक्कम ५० हजार असणार आहे.

शरीराला पाण्याची गरज का असते ? जाणून घ्या ही ५ कारणे

महिलांनो, बाळंतपणानंतर पुन्हा मिळवता येऊ शकतो कमनीय बांधा

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील रिलॅक्स करणे गरजेचे

जायरा वसीमच्या बॉलीवूड सोडण्याच्या निर्णयावर तसलीमा नसरिनने दिली प्रतिक्रिया

नोकरी शिक्षणानंतर आता स्थानिक निवडणुकांत मराठा आरक्षण ?