‘शाओमी’चा ‘हा’ 5G स्मार्टफोन ‘लॉन्च’ होण्याची उत्सुकता, एका मिनीटात विकले गेले 200 कोटींचे फोन

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – शाओमी या मोबाइल स्मार्टफोन कंपनीने नवी सीरीज Mi 10 सादर केली आहे. कंपनीने ही सीरीज पहिल्यांदा चीनमध्ये सादर केली होती. या फोनचा पहिला सेल 14 फेब्रुवारीपासून सुरु झाला. या 5 जी फोनमधील 108 मेगापिक्सल कॅमेरा असल्याने काही मिनिटात हे फोन विकले केले. एका वृत्तानुसार या फोनने 1 मिनिटात 2000 मिलियन युवानचा आकडा गाठला. म्हणजेच भारतीय रुपयात 200 कोटींपेक्षा जास्त.

शाओमीच्या मते फोन Tmall, JD.कॉम आणि शाओमी या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करुन देण्यात आला होता. कंपनीने हे ही सांगितले की पुढील सेल 21 फेब्रुवारीला असेल.

Mi 10 ची किंमत –
या स्मार्टफोनचे तीन वेरिएंट लॉन्च करण्यात आले आहेत. 8GB रॅम+ 128GB स्टोरेजच्या फोनची किंमत 40,800 रुपये आहे. तर 8GB रॅम+ 256GB स्टोरेज असलेले वेरिएंटची किंमत 44,000 रुपये आहे. तर 12GB रॅम+ 256GB स्टोरेजच्या वेरिएंटची किंमत 48,000 रुपये आहे.

काय आहे खासियत –
चीनमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या या फोनमध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 90Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. या फोनची खासियत आहे या फोनचा 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा. यातील एक कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे तर दोन कॅमेरे 2 मेगापिक्सलचे आहेत. सेल्फी फोनमध्ये 20 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. फोन 8 के व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट करतो. यात 4,780 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 30W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 30W वायरलेस फास्ट चार्जिंगने चार्ज होते.

You might also like