डॉक्टर प्रेयसीचा लग्नास नकार ; टेक्निशियन युवकाची आत्महत्या

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – डॉक्टर तरुणीने लग्नास नकार दिल्याच्या रागातून एमआरआय टेक्निशियन असलेल्या अमित अशोक मिंडे (वय २२) या युवकाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर शिवारात ही घटना घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील रहिवासी अमित मिंडे पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील एका खासगी रुग्णालयात एमआरआय टेक्निशियन होता. या रुग्णालयात एक डॉक्टर तरुणी नोकरी करीत होती. एकाच रुग्णालयात असल्याने दोघांचे प्रेमसबंध जुळले होते. मंगळवारी (५ मार्च) डॉक्टर तरुणी तिच्या घरी गेली होती. तिच्या समवेत अमित मिंडे हादेखील आला होता. त्याने लग्नासाठी गळ घातली होती. मात्र महिला डॉक्टरने लग्नास नकार दिला.

प्रेमभंग झालेल्या मिंडे याने मोबाइलवरून कुटुंबीयांशी संपर्क साधून घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर कौठेकमळेश्वर शिवारात अमितने डाळिंब बागेत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. बुधवारी सायंकाळच्या सुमारास काही महिला सरपण काढण्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी गेल्या असता त्यांना मिंडे याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ह्याही बातम्या वाचा –

पुण्याच्या ग्राहकाकडून बारबालाच्या अपहरणाचा प्रयत्न  

चोरीसाठी आचारसंहिता ; ‘चोरी’च्या पैशातून गावासाठी केली ‘ही’ योजना

Loading...
You might also like