नीरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तेजश्री काकडे तर उपसरपंचपदी राजेश काकडे यांची बिनविरोध निवड

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्यातील नीरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तेजश्री विराज काकडे यांची तर उपसरपंचपदी कॉंग्रेसचे राजेश अशोकराव काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या बाबतची घोषणा अध्यासी अधिकारी यांनी केली.

पुरंंदर तालुुुक्यातील नीरा ग्रामपंचायतीच्या सतरा जागांसाठी १५ जानेवारीला निवडणुक झाली. या निवडणुकीत नीरा विकास आघाडीला दहा जागा, चव्हाण पँनेलला चार तर भैरवनाथ विकास आघाडीला तीन जागा मिळाल्या. त्या पार्श्वभुमीवर नीरा ग्रामपंचायतीत मंगळवारी (दि.९) अध्यासी अधिकारी व पुरंदरचे सहा. गटविकास अधिकारी मिलिंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित सदस्यांची बैठक झाली.

या बैठकीत नीरा ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. जि. प. चे माजी सदस्य विराज काकडे यांच्या पत्नी तेजश्री विराज काकडे यांचा तर सरपंच पदासाठी व राजेश अशोकराव काकडे यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने दोघांची बिनविरोध निवड झाल्याचेअध्यासी अधिकारी मिलिंद मोरे यांनी जाहीर केले. ग्रामसेवक मनोज डेरे यांनी सहाय्यक म्हणून कामकाज पाहिले.

यावेळी जि. प. चे माजी सदस्य विराज काकडे, दिपक काकडे व ग्रामंपचायतीचे नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर सरपंच व उपसरपंचांचे पुरंदर पं. स. चे उपसभापती प्रा. डॉ. गोरखनाथ माने, रमणिकलाल कोठडिया, सोमेश्वरचे संचालक लक्ष्मण गोफणे, नाना जोशी, चंदरराव धायगुडे, धनंजय काकडे, चंद्रशेखर काकडे यांच्यासह बहुसंख्य नागरिकांनी अभिनंदन केले.

यावेळी सरपंच व उपसरपंचांचे गुलालाची उधळण, फटाक्याच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.