Tejasswi Prakash And Karan Kundra | “मी लग्नासाठी तयार पण…”, अभिनेत्री तेजस्वीने केला करण कुंद्रा व तिच्या लग्नाचा खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन – छोट्या पडद्यावरील हिट कपल म्हणजे तेजस्वी प्रकाश व करण कुंद्रा (Tejasswi Prakash And Karan Kundra) हे नेहमी चर्चेत असतात. तेजस्वी व करण हे अनेकदा एकमेंकांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड करताना स्पॉट होतात. या कपलचा मोठा चाहता वर्ग असून त्यांची ऑनस्क्रीन व ऑफस्क्रीन जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. आता तेजस्वी व करण हे (Tejasswi Prakash And Karan Kundra) कपल लग्नबंधनात कधी अडकणार याबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागली असून अभिनेत्री तेजस्वीने तिच्या व करणच्या लग्नाबाबत खुलासा केला आहे.

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश व करण कुंद्रा हे कपल अनेक दिवसांपासून एकमेंकांना डेट करत आहेत. (Tejasswi And Karan Wedding) चाहत्यांना हे कपल आवडत असून त्यांना ‘तेजरन’ (Tejran) असे बोलावले जाते. एका मुलाखती दरम्यान तेजस्वी प्रकाश म्हणाली की, “मी आणि करण लग्न कधी करणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण मी लग्नासाठी तयार आहे असं जेव्हा मला वाटेल तेव्हा मी नक्कीच लग्न करण्याचा निर्णय घेईल. आम्हा दोघांची काही स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याचा सध्या आमचा प्रयत्न आहे. आमच्यावर कोणाचाही दबाव नसल्याने मी जेव्हा लग्नासाठी तयार असेन तेव्हा तो माझ्यासोबत लग्न करेन”.

तेजस्वी प्रकाश व करण कुंद्रा या दोघांचे सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. नुकतेच एका अल्बमसाठी करण आणि तेजस्वी यांनी स्क्रिन शेअर केली. ‘बारिश आई है’ (Barish Ai Hai) या रोमॅंटिंक गाण्यातून हे कपल प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यांच्या या नवीन गाण्याला करोडोंमध्ये व्ह्युज आहेत. चाहते तेजस्वी व करणच्या लग्नाची प्रतिक्षा करत आहेत. तेजस्वीने ती लग्न कधी करणार याबाबत सांगितले आहे.

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश व करण कुंद्रा हे अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. त्यांनी एकत्र हिंदी ‘बिग बॉस 15’मध्ये (Bigg Boss 15) स्पर्धेक म्हणून सहभाग घेतला. या बिग बॉसच्या घरात त्यांची मैत्री झाली तर पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले व ते रिलेशनशिपमध्ये (Tejasswi Prakash And Karan Relationship) आले. बिग बॉसनंतर तेजस्वी एकता कपूरच्या’ (Ekta Kapoor Serials) नागिन 6′ (Naagin 6) या मालिकेत झळकली. तर करणने छोट्या पडद्यावरील काही कार्यक्रम होस्ट केले. करण व तेजस्वी दोघेही सध्या मनोरंजन विश्वात यशाच्या शिखरावर असून त्यांचे नातेही सर्वत्र गाजत आहे.

Web Title :  Tejasswi Prakash And Karan Kundra | tejasswi prakash karan kundra wedding update tejasswi prakash on marriage plans with boyfriend karan kundrra know details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | तारण ठेवलेले दागिने मोडून जबरदस्तीने कार नेली; 18 लाखांची मागणी करणाऱ्या सावकराला अटक

Mumbai Agra Highway Accident | मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, कंटेनर हॉटेलमध्ये घुसून 12 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या बहाण्याने केली लाखो रुपयांची फसवणूक

Amol Kolhe | अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार?

Pune Crime News | पुणे: गुन्हे शाखेतील पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल ! 2 पोलिस, महिलेसह 5 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा

LPG Gas Cylinder Price | व्यावसायिक एलपीजी सिलिंडर महागला; जाणून घ्या नवीन दर

Petrol-Diesel Price Today | तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर काय? जाणून घ्या

Maharashtra Monsoon Update | अनेक भागात पावसाची संततधार; कोकणात ‘ऑरेंज’ तर विदर्भासह मराठवाड्यात ‘यलो अलर्ट’